5 वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केलेली असेल तर ग्रॅच्युइटी मिळणार का? ग्रॅच्युईटीचे नियम काय सांगतात? वाचा…

Tejas B Shelar
Published:
Gratuity Rules

Gratuity Rules : खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील नोकरदार मंडळीचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ग्रॅच्युइटी. ग्रॅच्युइटी हे कंपनीने दिलेले बक्षीस असते, जे की कर्मचाऱ्याला त्याच्या दीर्घ कालावधीतील उत्कृष्ट सेवांच्या बदल्यात दिले जाते. पण, कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ग्रॅज्युएटीचे काही नियम असतात.

या नियमांच्या अधीन राहूनच याचा कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो. ग्रॅज्युएटीच्या नियमानुसार, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत 5 वर्षे सतत काम करता, तेव्हा तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र बनत असतात.

पण अनेकांच्या माध्यमातून पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तर ग्रॅच्युइटी मिळू शकते का असा प्रश्न उपस्थित केला जातो. दरम्यान आज आपण याच संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल तर ग्रॅच्युइटी मिळते का?

जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्षे 11 महिने काम केले असेल, म्हणजे 5 वर्षांपेक्षा फक्त 1 महिना कमी काम केलेले असेल तर कंपनी त्याला ग्रॅच्युइटी देईल का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्षे 8 महिने काम केले असेल, तर त्याची सेवा पूर्ण 5 वर्षे मानली जाते आणि त्याला 5 वर्षानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाते. परंतु जर नोकरी यापेक्षा कमी कालावधीसाठी म्हणजेच 4 वर्षे 7 महिने किंवा चार वर्षे साडेसात महिने असेल तर ती केवळ 4 वर्षांसाठीच गृहीत धरली जाईल आणि अशा परिस्थितीत ग्रॅच्युइटी दिली जाणार नाही. अर्थातच, पाच वर्षांला चार महिने कमी असताना जर नोकरी सोडली तर ग्रॅच्युइटी मिळू शकते पण जर चार वर्षे आणि सात महिने नोकरी करून जर नोकरी सोडली तर ग्रॅज्युएटी मिळणार नाही. पण, जर तुम्ही 4 वर्षे आणि 6 महिने काम केल्यानंतर राजीनामा दिला, परंतु राजीनामा दिल्यानंतर तुम्ही दोन महिन्यांचा पूर्ण नोटिस कालावधी पूर्ण केला. तर या प्रकरणात, कंपनीतील तुमची एकूण सेवा 4 वर्षे आणि 8 महिने होती अन अशा प्रकरणांमध्ये 5 वर्षांचा विचार करून, तुम्हाला ग्रॅच्युइटीच्या रकमेतील त्याचा हिस्सा देण्यात येतो. नोकरीवर असताना जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, 5 वर्षांच्या नोकरीची अट लागू होत नाही. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युइटी खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. जर खाजगी किंवा सरकारी कंपनीत 10 किंवा त्याहून अधिक लोक काम करत असतील तर त्या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ दिला पाहिजे. कंपनीशिवाय दुकाने, खाणी आणि कारखाने या नियमाच्या कक्षेत येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe