Gravton Quanta Electric Bike:- सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स बाजारपेठेमध्ये जर बघितले तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेल्या बाईक आणि स्कूटर पाहायला मिळत आहेत. सध्या इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरची बाजारपेठ खूप जोरात असून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून देखील या बाईक्स आणि स्कूटर्सना प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
या इलेक्ट्रिक बाइक क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या असून त्यांनी वेगवेगळ्या वैशिष्ट्ये आणि किंमत असलेल्या बाईक्स सध्या लॉन्च केल्यामुळे ग्राहकांना देखील अनेक पर्याय खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.
यासोबतच इलेक्ट्रिक कारचा वापर देखील आता वाढताना दिसून येत असून अनेक कार उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रिक कार निर्मितीकडे वळले असल्याने मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कार देखील बाजारामध्ये लॉन्च केल्या जात आहेत व या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून येणाऱ्या काही वर्षात आपल्याला रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसून येतील.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बघितले तर ग्रेव्हटन मोटारने 29 नोव्हेंबर 2024 रोजी भारतामध्ये काँन्टा इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली असून ही बाईक भारतातील पहिली ऑल टेरेन इलेक्ट्रिक बाइक असल्याचा दावा कंपनीने केलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बाइक घेणाऱ्या ग्राहकांसाठी नक्कीच एक उत्तम असा पर्याय आता बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे.
कसे आहे या इलेक्ट्रिक बाइकचे स्वरूप?
ग्रेव्हटन मोटरने 29 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत काँन्टा इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली असून या बाईक बाबत कंपनीने दावा केला आहे की ही इलेक्ट्रिक बाइक भारतातील पहिली ऑल टेरेन इलेक्ट्रिक बाइक आहे, ज्यामध्ये लिथियम मॅग्नीज आयर्न फॉस्फेट म्हणजेच एलएमएफपी बॅटरी देण्यात आली आहे.
जर आपण बाजारपेठेत या बाईकची स्पर्धा बघितली तर ती प्रामुख्याने बजाज चेतक, टीव्हीएस आय क्यूब, ओला एस 1 आणि एथर 450X शी असणार आहे.या इलेक्ट्रिक बाइकची लांबी 1945 मीमी व रुंदी 735 मीमी इतकी आहे.
उंची 1070 mm असून तिचे कर्ब वेट ११३.६ किलो इतकी आहे व या इलेक्ट्रिक बाइकचा व्हिलबेस १२६० मीमी इतका आहे. ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला असून 183 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे व सीटची उंची साधारणपणे 785 मिमी इतकी आहे.
कशी आहे या बाईक मधील मोटर आणि बॅटरी?
या इलेक्ट्रिक बाइकमध्ये बीएलडीसी इनबिल्ट रियर व्हील मोटर वापरण्यात आली असून तिची पावर 3Kw इतकी आहे व या माध्यमातून ती 170 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या बाईकला 70 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देण्यात आलेला आहे व ही बाईक प्रामुख्याने इको, पावर आणि स्पोर्ट अशा तीन रायडिंग मोडमध्ये येते.
तसेच बॅटरी जर बघितली तर यामध्ये 2.78kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला असून ही बॅटरी लिथियम मॅगनीज आयर्न फॉस्फेट प्रकाराची आहे.
या बाईकची रेंज जर बघितली तर ती इको मोडला 125 किलोमीटर, पावर मोडला 100 किलोमीटर आणि स्पोर्ट मोडला 25 किलोमीटर इतकी आहे. तसेच चार्जिंगचा वेग जर बघितला तर शून्य ते 80 टक्के चार्जिंग होण्यासाठी 90 मिनिटांचा वेळ घेते.
किती आहे ग्रेवटन काँन्टा इलेक्ट्रिक बाइकची किंमत?
ग्रेवटन मोटर कंपनीने लॉन्च केलेल्या या इलेक्ट्रिक बाइकची एक्स शोरूम किंमत 1 लाख 2 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.