हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे. या शुभ दिवशी गणपती आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते. दीपावलीच्या पवित्र दिवशी प्रभू राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. प्रभूच्या आगमनानिमित्त नागरिकांनी दिवे लावून स्वागत केले.
दिवाळीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांसोबत सुंदर फोटो, संदेश, शायरी, प्रेमाने भरलेले संदेश आपण आपल्या प्रियजनांना पाठवत असतो असेच काही निवडक संदेश आम्ही ह्या पोस्टमध्ये दिले आहेत जे तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता
1) लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास…!!!!!सर्व मित्र परिवाराला … दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय !!! दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
2) सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
3) घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
4) यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके, येत्या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
5) लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. दिपावलीच्या तुम्ही आणि तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.
6) गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. !! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
7) पणतीचा उजेड अंगणभर पडू दे लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे… लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो, दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
8) मनाचे लक्ष्मिपुजन समृद्धीचे फराळ प्रेमाची भाऊबीज अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा””लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!”
9) एक दिवा लावु जिजाऊचरणी एक दिवा लावु शिवचरणी, एक दिवा लावु शंभुचरणी आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा. आपल्या घरी सुख समाधान सदैव नांदो हिच देवाजवळ प्रार्थना.
10). नरकचतुर्दशी सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दी व भरभराटीची जावो. !!शुभ दिपावली !!
11) फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. !! दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.
12) दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण. !! शुभ दीपावली !!
13) “स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सुखी, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो सर्वांना… यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन समृद्धीचा फराळ प्रेमाची भाऊबीज अशा दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा!
14) सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली.. शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी दीपावली…शुभ दीपावली
15) आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून !! शुभ दिपावली !!
16) दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!