Happy New Year 2024 Wish In Marathi : नवीन वर्ष येत्या काही तासात सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या उल्हासाच्या वातावरणात नववर्षाभिनंदनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सोशल मीडियामध्ये वायरल काही मराठी Wishes तुमच्यासाठी घेऊन हजर झालो आहोत. खरे तर 2023 वर्ष आता अवघ्या काही तासात संपणार आहे. येत्या 26 ते 27 तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे.
यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच बाजारपेठा सजल्या आहेत. काहीजण उद्याच्या 31 st ची आतापासूनच तयारी करत आहेत. दरम्यान येणारे नवीन वर्ष सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशा आशयाच्या शुभेच्छा सर्वजण आपल्या प्रियजनांना पाठवत आहेत.
जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना नूतन वर्षाभिनंदनाच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर आज आम्ही सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले असेच काही लोकप्रिय मेसेजेस तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे मेसेजेस तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
व्हाट्सअप, instagram, मेसेज, फेसबुक इत्यादींवर तुम्ही हे मेसेज पाठवून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतात. आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, ऑफिसमधील सहकाऱ्यांना व्हॉट्सअपवर मेसेजच्या माध्यमातून हे मॅसेज पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना नववर्षाभिनंदनाच्या शुभेच्छा तर देऊ शकणार आहात. शिवाय, फेसबूक पोस्टवर आणि व्हॉट्सअप स्टेट्सवर देखील हे मेसेज ठेवू शकता.
1)घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
2)दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!! नवीन वर्षाच्या मोरपंखी शुभेच्छा.
3)येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…!
4)आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
5)स्वप्न साकार होण्याच्या जादूने आणि नवीन सुरुवातीच्या सौंदर्याने भरलेल्या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. तुमचा प्रवास आनंद, प्रेम आणि हास्याने सजला आणि प्रत्येक दिवस आनंदाचा अध्याय असू दे.
6) नवीन वर्ष तुमच्यासाठी भरपूर आनंद घेऊन येवो, आठवणींचा खजिना घेऊन येवो आणि हास्याचा झरा घेऊन येवो. प्रत्येक दिवस एक भेटवस्तू असू दे आणि तुमचे हृदय जीवनातील सुंदर आशीर्वादांचे कृतज्ञ प्राप्तकर्ता होवो.
7)घड्याळ जसजसे नवीन वर्षाकडे वळते, तसतसे ते विलक्षण साहस, अमर्याद आनंद आणि प्रेमाच्या टेपेस्ट्रीची सुरुवात होवो. तुमचे दिवस हास्याने आणि तुमचे हृदय अनंत आनंदाने भरले जावो.
8)नमस्कार…
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
9) नमस्कार..
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात
याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच
आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
10)आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं.
!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
11)माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो.
चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..
हॅपी न्यू इअर
12)जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
13)नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
14)पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
15)गतवर्षीच्या फुलाच्या पाकळ्या वेचून घे.
बिजलेली आसवे झेलून घे.
सुख दुःख झोळीत साठवून घे.
आता उधळ हे सारे आकाशी.
नववर्षाचा आनंद भरभरून घे.
नवीन वर्षाच्या खुप सार्या शुभेच्छा
16)मला आशा आहे की, नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.
मित्रा नवीन वर्षाच्या अनेकोनेक शुभेच्छा
17)नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.
Happy New Year 2024 Friend
18) 31 तारखेला फुल एन्जॉय करा आणि नवीन वर्षात भरपूर मेहनत करा ! ईश्वर तुमच्या मेहनतीला फळ देवो येणारे नवीन वर्ष तुमचे स्वप्न पूर्ण करो
19)प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं… पण या नव्या वर्षात तुम्हाला सर्व काही मिळो जे तुम्हाला मनापासून हवं आहे. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
20)नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
21)जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
22)डोळ्यात No Tear
मनात No Fear
Forget Everything and Enjoy Dear
मित्रा तुला आणि तुझ्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
23)एक सौंदर्य, एक नवीन उत्साह ,
एक नवीन स्वप्न एक कल्पना,
एक विश्वास, एक आस्था. एक चांगला विचार.
हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात.
नवीन वर्षाच्या नवीन हार्दिक शुभेच्छा.
24) स्वप्ने उरलेली, या नव्या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !