महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त हरभऱ्याच्या टॉप 3 सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता ! वाचा….

ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात जिरायती भागात हरभऱ्याची लागवड झाल्यास परतीच्या पावसाचा पिकाला फायदा होत असतो. दुसरीकडे जर तुम्ही बागायती भागात हरभरा लागवड करू इच्छित असाल तर 20 ऑक्टोबर पासून ते दहा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही हरभरा पेरणी करू शकता.

Tejas B Shelar
Published:
Harbhra Lagwad

Harbhra Lagwad : यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर राज्यात रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जिरायती हरभऱ्याचे लागवड ही ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात झाली पाहिजे.

ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात जिरायती भागात हरभऱ्याची लागवड झाल्यास परतीच्या पावसाचा पिकाला फायदा होत असतो. दुसरीकडे जर तुम्ही बागायती भागात हरभरा लागवड करू इच्छित असाल तर 20 ऑक्टोबर पासून ते दहा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही हरभरा पेरणी करू शकता.

अर्थातच बागायती भागात हरभरा पेरणीसाठी आणखी थोडे दिवसं वाव आहे. दरम्यान आज आपण हरभऱ्याच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही बागायती भागात हरभरा लागवड करू इच्छित असाल तर तुम्ही या जातींची निवड करून चांगले उत्पादन मिळवू शकणार आहात.

दिग्विजय : बागायती भागात दिग्विजय जातीच्या हरभऱ्याची लागवड केली जाऊ शकते. ही जात उशिरा पेरणीसाठी देखील उपयुक्त आहे. बागायती भागात लागवड केल्यास 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर बागायती भागातून या जातीपासून 23 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येऊ शकते.

या जातीची उशिरा पेरणी केली तरी 21 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. हरभऱ्याची ही जात महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त आहे. ही जात मर रोगास प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फुले विक्रम : हरभऱ्याची ही देखील एक विशेष लोकप्रिय जात आहे. या जातीची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. बागायती भागात या जातीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.

बागायती भागात या जातीची लागवड केल्यास सरासरी 110 दिवसात पीक परिपक्व होते आणि यापासून 22 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. महत्त्वाचे म्हणजे ही जात उशिरा पेरणीसाठीही उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

जॅकी 9218 : हरभऱ्याची ही आणखी एक सुधारित जात. जिरायती आणि बागायती भागात लागवडीसाठी उपयुक्त. या जातीचे पीक हे 105 ते 110 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून सरासरी 18 ते 20 क्विंटल एवढे उत्पादन मिळते.

या जातीचे दाणे हे टपोरे असतात त्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो. महत्त्वाचे म्हणजे मर रोगास प्रतिकारक असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. यामुळे या जातीच्या हरभऱ्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच चांगले उत्पादन मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe