Fort In Maharashtra:- महाराष्ट्र आणि पर्यटन स्थळे यांचे एक अतूट असे नाते असून महाराष्ट्राला निसर्गाने सढळ हाताने भरभरून दिले आहे व याचाच परिणाम स्वरूप जर आपण बघितले तर महाराष्ट्रामध्ये अनेक निसर्गाने समृद्ध असलेली पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांमध्ये ज्या प्रकारे आपण डोंगरदर्या तसेच उंचच उंच धबधबे, हिल स्टेशन्स तसेच निसर्गरम्य अशी इतर पर्यटन स्थळे व कोकणासारख्या परिसराला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा यांचा उल्लेख करतो.
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राला ऐतिहासिक समृद्ध परंपरा लाभल्याने अनेक गड किल्ल्यांची रेलचेल आपल्याला महाराष्ट्र मध्ये दिसून येते. आपल्या इतिहासाच्या खुणा तुम्हाला या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून दृष्टीक्षेपात पडतात. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर गड-किल्ल्यांचे दर्शन होते व त्याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक असे किल्ले आहेत
व या ठिकाणी ट्रेकर्स मोठ्या प्रमाणावर दरवर्षी भेट देतात. याच किल्ल्यांच्या संदर्भात जर आपण नाशिक जिल्ह्यातील हरिहर गड किल्ला पाहिला तर याला जगातील सर्वात मजबूत व भक्कम किल्ला म्हणून ओळखले जाते. ट्रेकिंग करता देखील हा खूपच अवघड किल्ला असून तितकाच धोकादायक देखील आहे.
नाशिक जिल्ह्यातील हरिहर गड किल्ला आहे जगातील सर्वात मजबूत
नाशिक जिल्हा म्हटलं म्हणजे अनेक पर्यटन स्थळांची भूमी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अगदी याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये असलेला हरिहर गड किल्ला हा जगातील सर्वात मजबूत किल्ला असून तो सर्वात धोकादायक किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. अक्षरशः ट्रेकिंग साठी देखील हा खूपच अवघड किल्ला आहे.
जर आपण या किल्ल्याचे वैशिष्ट्य पाहिले तर हा पायथ्यापासून चौरस दिसतो व त्याची रचना प्रिझम सारखी आहे. दोन्ही बाजूने याची रचना नव्वद अंशाची असून तिसरी बाजू 75 अंश आहे. 170 मीटर उंच डोंगरावर हा किल्ला असून या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला 117 पायऱ्या चढून जावे लागते.
अगोदरच्या कालावधीमध्ये गोंडा घाटातून जो काही व्यापारी मार्ग जात होता त्या मार्गाच्या सुरक्षेसाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा समजला जात होता. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर हा किल्ला असून याची स्थापना ही सोना किंवा यादव वंशात झाली असल्याचे म्हटले जाते व साधारणपणे हा कालावधी 9 व्या ते 14 व्या शतकाचा होता. तुम्हाला जर या किल्ल्याला भेट द्यायचे असेल
तर तुम्ही नाशिक इथून या ठिकाणी जाऊ शकतात.नाशिक शहरापासून या किल्ल्याचे अंतर 40 किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला इगतपुरीचे नैसर्गिक सौंदर्य पाहून जर हा किल्ला पाहायला जायचे असेल तर हे अंतर 48 किलोमीटर आहे.
ट्रेकिंगकरिता राज्यातील सर्वात कठीण आहे हा किल्ला
आजच्या अनेक तरुण तरुणाईला ट्रेकिंगची अतिशय आवड असते. तसेच अशा किल्ल्यांची चढाई करण्याची आवड देखील कित्येक जणांमध्ये असते. किल्ल्यावर चढाई ही गोष्ट या ठिकाणी खूप अवघड असून या किल्ल्यावर तुम्हाला काही ठिकाणी 90° पर्यंत चढाई करावे लागते
हेच धाडस अनुभवण्यासाठी बरेच तरुण या गडावर येतात. ट्रेकिंग करिता हा किल्ला सर्वात कठीण समजला जातो व त्याकरिता ट्रेकर्समध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे. हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर असून असे म्हटले जाते की इंग्रजांनी देखील तोफेने हा किल्ला उडवण्याचे योजना बनवली होती.