मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 12 जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, हवामान खात्याचा अंदाज

Tejas B Shelar
Published:
Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : राज्यातून मान्सून परतल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागली. मान्सूनोत्तर पावसामुळे मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. राज्याचे कमाल तापमान हे दररोज बदलत आहे.

अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान 34° c पेक्षा अधिक नमूद केले जात आहे हे विशेष. त्यामुळे सर्वसामान्य जनता उकाड्याने हैराण झाली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात 29 ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता.

मात्र अजून तरी राज्यात कुठेच पाऊस झालेला नाही. अजूनही राज्यात उकाडा जाणवतोय. नैर्ऋत्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होत आहे. दुसरीकडे कमाल तापमानातील वाढ कायम असून, किमान तापमानात चढ-उतार होत आहे.

पहाटे गारठा, धुके आणि दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पहाटे गारठा, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी थोडेसे ढगाळ हवामान अशी काहीशी विचित्र हवामान परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज अर्थातच 31 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज दिला असून या अनुषंगाने सदरील जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणातील दक्षिणेकडील, मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील

आणि मराठवाडा विभागातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये दिला आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बारा जिल्ह्यांना आज भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe