स्पेशल

मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी

Published by
Tejas B Shelar

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा देशात पावसाचा अंदाज दिला आहे. देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी थंडीची तीव्र लाट येणार असा अंदाज या खाजगी एजन्सीने जारी केला आहे.

खरे तर डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील पावसाळ्यात अतोनात नुकसान झाले आणि यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत.

शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे, फळबागांचे तसेच कांदा पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण आपल्या महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत हवामान खात काय म्हणत या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

हवामान खात्याचा नवा अंदाज

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमान आणखी कमी होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात 2 ते 3 अंशांची घट अपेक्षित आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत आहे.

एकंदरीत महाराष्ट्रात थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. पण, देशाच्या उत्तरेकडे सध्या पश्चिमी झंझावात आणि दक्षिणी वाऱ्यांमुळं काही राज्यांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडेल आणि काही ठिकाणी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे. हिमाचल प्रदेशात तर हिमवृष्टी होणार असा अंदाज देण्यात आला आहे.

स्कायमेटच्या अंदाजाबाबतीत बोलायचं झालं तर स्कायमेटने अरुणाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिम क्षेत्र, अंदमान आणि निकोबार बेटांसह लक्षद्वीपमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज या एजन्सी कडून देण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, आसाम, मेघालयसह हिमाचलचा काही भाह आणि पूर्व राजस्थानमध्ये दाट धुक्यासह पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत. अरुणाचल, आसाम आणि लक्षद्वीपमध्ये काही भागांत मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar