HDFC Bank Home Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वाधिक मोठ्या एचडीएफसी बँकेकडून गृह कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग बँकेची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी काळजीपूर्वक वाचा. खरंतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे अनेक जण गृह कर्जाला पसंती दाखवत आहेत.
गृह कर्ज घेऊन घर खरेदी करणे हे वाईटही नाही. तज्ञ लोक देखील सर्वसामान्यांना गृह कर्ज घेऊन घर खरेदीचा सल्ला देताना दिसतात. हेच कारण आहे की देशातील अनेक बँका सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या व्याजदरावर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक देखील आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज देते. मात्र एचडीएफसी बँकेकडून पगारानुसार किती गृह कर्ज मंजूर होणार हा मोठा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होतो. दरम्यान आज आपण याच बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 9.40% ते 9.95% या स्टॅंडर्ड व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. तसेच स्पेशल व्याजदर हे 8.75 टक्क्यांपासून सुरू होत आहे.
मात्र ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर असतो त्यांनाच स्पेशल व्याजदराचा फायदा मिळतो. किमान 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना स्पेशल व्याजदरात गृहकर्ज मिळते.
60 लाखाचे कर्ज मिळाल्यास कितीचा हफ्ता भरावा लागणार?
एचडीएफसी बँकेकडून जर तीस वर्ष कालावधीसाठी 60 लाख रुपयांचे गृह कर्ज किमान व्याजदरात म्हणजेच 8.75% या दराने मंजूर झालेत तर सदर व्यक्तीला चाळीस हजार 202 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
अर्थातच सदर कर्जदाराला एक कोटी 44 लाख 72 हजार 720 रुपये बँकेला अदा करावे लागणार आहेत. म्हणजेच सदर कर्जदाराला 84 लाख 72 हजार 720 रुपये व्याज म्हणून भरावे लागणार आहेत.
किती पगार असल्यास 60 लाखाचे कर्ज मिळणार ?
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे किती पगार असल्यास 60 लाखांचे कर्ज मंजूर होणार? जर तुमच्या डोक्यावर आधीपासूनच कोणत्याही प्रकारचे कर्ज नसेल तर तुम्हाला किमान 94 हजार 404 रुपये मासिक पगार असणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला एवढा पगार असेल अन आधीच तुमच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसेल तर तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून 60 लाख रुपये गृह कर्ज मंजूर होऊ शकते.