तुम्हाला ‘इतका’ पगार असेल तर एचडीएफसी बँक काही मिनिटातच मंजूर करणार 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन ! वाचा….

Tejas B Shelar
Published:
HDFC Bank Personal Loan Details

HDFC Bank Personal Loan Details : एचडीएफसी ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील आणि एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील देशातील नामवंत बँक आहे.

एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. बँकेकडून ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्ज देखील ऑफर केले जात आहे. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या वैयक्तिक कर्जाची माहिती जाणून घेणार आहोत.

बँकेकडून दहा लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर महिन्याचा पगार किती असायला हवा ? जर बँकेने एखाद्या ग्राहकाला दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले तर त्याला किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो? या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

HDFC बँकेचे वैयक्तिक कर्जासाठी चे व्याजदर
एचडीएफसी बँक इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर आकारते. फक्त एचडीएफसीच नाही तर देशातील सर्वच बँका इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर आकारतात.

त्यामुळे फारच आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारावा अन्यथा इतर पर्यायी मार्गाने पैशांची उपलब्धता करावी असा सल्ला जाणकार लोक नेहमी देतात.

मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना किमान 10.85% या इंटरेस्ट रेट वर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. ग्राहकांना जर या किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज हवे असेल तर त्यांचा सिबिल स्कोर मात्र स्ट्रॉंग असायला हवा.

ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांना एचडीएफसी कडून 10.85% या किमान इंटरेस्ट रेट वर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

दुसरीकडे एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्जासाठी प्रोसेसिंग फी देखील वसूल केली जाते. एचडीएफसी बँक कमाल 6500 +GST एवढी प्रोसेसिंग फी वसूल करत असल्याची माहिती बँकेकडून समोर आली आहे.

10 लाखांचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार
एचडीएफसी बँकेकडून 10 लाख रुपयांचे पर्सनल लोन 10.85% या इंटरेस्ट रेट वर पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर झालेत तर सदर ग्राहकाला 21,668 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

अर्थातच सदर व्यक्तीला 13 लाख 80 रुपये बँकेला द्यावे लागतील. तीन लाख 80 रुपये व्याज म्हणून सदर ग्राहकाला बँकेकडे जमा करावे लागणार आहेत.

10 लाखाच्या कर्जासाठी किती पगार हवा
जर तुमच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसेल अन तुमचा किमान पगार 43,336 रुपये प्रति महिना एवढा असेल तर तुम्हाला दहा लाख रुपयांचे पर्सनल लोन एचडीएफसी बँकेकडून मंजूर केले जाऊ शकते.

जर तुमच्यावर आधीपासूनच एखाद्या बँकेचे कर्ज असेल तर तुम्हाला आधी हे कर्ज नील करावे लागेल, यानंतर मग तुम्ही एचडीएफसी कडून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe