Health Tips:- उत्तम आरोग्य आणि सुदृढ शरीर ही व्यक्तीची खरी संपत्ती असून तुमचे आरोग्य जर चांगले असेल व शरीर सुदृढ असेल तर तुम्ही जगातील कुठलीही अशक्य गोष्ट मिळवू शकतात व अशक्य गोष्ट शक्य करू शकतात. त्यामुळे समृद्ध जीवनासाठी समृद्ध आरोग्य व समृद्ध शरीर असणे खूप गरजेचे आहे.
त्यामुळे उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार घेणे किंवा संतुलित आहाराचे सेवन करणे खूप गरजेचे असते. आपल्याला माहित आहे की संतुलित आहारामध्ये हिरव्या भाजीपाला तसेच विविध फळांचा समावेश असणे गरजेचे आहे व त्यासोबतच अंडी तसेच मटन किंवा चिकन इत्यादी मांसाहारी पदार्थांचा देखील योग्य पद्धतीने प्रमाणात आहारात समावेश असणे गरजेचे आहे.
इतकेच नाही तर दूध आणि दुधापासून तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ यांचा देखील आहारात समावेश असणे महत्त्वाचे ठरते. दुग्धजन्य पदार्थांचा विचार केला तर यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात तूप आहारामध्ये वापरले जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तूप फायदेशीर असून असे म्हटले जाते की दिवसभरात किमान दोन ते तीन चमचे तूप खाणे फायद्याचे ठरते.
त्वचेच्या आरोग्या करिता तसेच पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी व हाडांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी देखील तुपाचं सेवन आवश्यक असते. तुपामध्ये 25% ट्रायग्लीसराईड आणि 75 टक्के सॅच्युरेटेड फॅट्स असतात.
एकंदरीत हे सगळे घटक शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे घटक जेव्हा शरीरात शोषले जातात तेव्हा एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.
परंतु तुपाच्या बाबतीत बघितले तर आपण किती तूप खाणे किंवा कोणते तूप खाणे फायद्याचे ठरेल हे बऱ्याच जणांना माहीत नसते? म्हणजेच म्हशीच्या दुधापासून तयार तूप चांगले की गायीच्या दुधापासून बनवलेले तूप चांगले? याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे.
कोणासाठी कोणते तूप राहील चांगले?
1- आयुर्वेदानुसार बघितले तर गाईच्या तुपामध्ये म्हशीच्या तुपापेक्षा जास्त प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात. एवढेच नाही तर गाईचे तूप हे सात्विक म्हणून देखील ओळखले जाते व या तुपामुळे शारीरिकच नाही तर मानसिक वाढ होण्यास देखील मदत होते व एकंदरीत व्यक्ती सकारात्मक पद्धतीने राहतो.
2- म्हशीच्या तुपाचा विचार केला तर यामध्ये फॅट्स जास्त प्रमाणात असतात व ते दीर्घकाळ टिकते. परंतु त्या तुलनेत मात्र सामान्य तापमानाला गायीचे तूप तितके टिकत नाही.
3- ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी गायीचे तूप आवर्जून खाणे गरजेचे आहे. कारण वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी जर म्हशीचे तूप खाल्ले तर मात्र त्या तुपात असलेल्या फॅट्समुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
4- जसे जसे वय वाढते तसे तसे व्यक्तींना हाडाच्या समस्या निर्माण व्हायला लागतात व अशा प्रकारच्या समस्या महिला वर्गामध्ये देखील दिसून येतात. त्यामुळे हाडांचे आरोग्य जर उत्तम ठेवायचे असेल तर म्हशीचे तूप खाणे जास्त चांगले समजले जाते. तसेच वातावरण बदलामुळे जर सर्दी खोकला किंवा कफाचा त्रास होत असेल तर तो कमी होण्यासाठी देखील म्हशीचे तूप चांगले मानले जाते.
5- ज्या लोकांना पचनसंस्थेशी संबंधित किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांनी म्हशीच्या तुपा ऐवजी आवर्जून गाईचे तूप खाणे गरजेचे आहे. कारण गाईच्या तुपाचा जर पचनाचा दर पाहिला तर तो 96% आहे व त्या तुलनेत मात्र म्हशीच्या तुपामध्ये फॅट्स जास्त असल्याकारणाने ते पचायला जड असते. बऱ्याच जणांना गॅस होण्याचा किंवा ऍसिडिटी इत्यादीचा त्रास असतो व असा त्रास असणाऱ्या लोकांनी गाईच्या तुपाचा आहारात वापर करावा.
6- कोलेस्टेरॉलच्या बाबतीत बघितले तर ही समस्या आपल्याला उद्भवू नये याकरता गाईचे तुप खाणे कधीही चांगले ठरते. ज्या लोकांना कोलेस्टेरॉलची समस्या आहे अशा लोकांनी गाईचेच तूप खाणे गरजेचे आहे.