Health Tips :- जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, परंतु असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
जेवल्यानंतर पाणी पिण्यास का मनाई आहे, आम्ही या लेखात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. (Health Tips: If you make this mistake right after a meal, beware)
यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो
जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याच्या सवयीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत डॉक्टर सांगतात की, जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने अन्न पचायला लागणारा वेळ वाढतो.
त्यामुळे तुमची भूक वाढते, त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होते. त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. जेवणानंतर तीस मिनिटांत पाणी प्यायल्याने पचनक्रियेला त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते, 30 मिनिटांनंतरच शरीर पचनाच्या पुढील टप्प्यावर पोहोचते.
पाणी लवकर प्यायल्याने पोषक तत्वे संपतात
जेवणानंतर जास्त प्रमाणात पाणी घेतल्याने आवश्यक एन्झाइम्स नष्ट होतात किंवा त्याचा परिणाम सौम्य होतो. यामुळे पाचक एंझाइम्स देखील कमी सोडले जातात ज्यामुळे छातीत जळजळ आणि ऍसिडिटी होते.