अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- अशा आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रभावानुसार दुसऱ्याच्या विचार-भावना- कृतीवर प्रभाव टाकत असतात. अशावेळी काही बाबी आपल्या नियंत्रणकक्षेत असतात, तर काहींवर नियंत्रण ठेवता येणे कठीण.
आणि ही स्थिती सुद्धा बदलत असते. बदल अनिवार्य असतो, या धारणेचा स्वीकार मानसिक स्वास्थ्याला पोषक ठरतो. वरील घटक व त्यांचे अस्तित्व आणि बदलते स्वरूप व्यक्ती-व्यक्तीतील भिन्नतेचे मूलभूत कारण ठरते.
त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती हे मान्य करून त्याचा स्वीकार कराल, तितके ते मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम, हे खरे! ही भिन्नता ब बदल जितक्या सहजतेने, सातत्याने, धैर्याने आणि धीराने स्वीकारले जातील, तितके आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
स्वीकाराची ही गुरूकिल्ली नकारात्मक भावना व ताणतणावाची परिस्थिती, अनुभव व प्रसंगांतही समर्पक ठरू शकते. मानसिक स्वास्थ्याला पोषक ठरणाऱ्या बाबींमध्ये आपली इच्छाशक्ती, सकारात्मक व नकारात्मक भावनांचा अनुभव-स्वीकार-व्यक्त करण्याची व योग्य नियोजन करण्याची क्षमता,
इतरांबरोबर सशक्त नातेसंबंध जोडण्याचे कौशल्य, ज्ञान मिळवण्याकडे कल, बदल आणि अशाश्वततेशी जुळवून घेण्याची तयारी यांचा समावेश असतो. यावरून हे लक्षात येते की, केवळ मानसिक आजार नसणे किंवा तो असल्यास त्यावर उपाय करणे म्हणजेच फक्त मानसिक स्वास्थ्य जोपासणे नव्हे;
तर दैनंदिन जीवन व्यतीत करत असताना मनोबलाप्रति उचललेली जाणीवपूर्वक पावलेही महत्त्वाचे योगदान करतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. व्यस्त वेळापत्रकामधून बहताश श लोकांना स्वतः साठी वेळ काढणं शक्य होत नाही.
पण, तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शारीरिक आरोग्याबरोबरच तुमचं मनदेखील तितकंच शांत असणे गरजेचं आहे. तसेच तुम्ही जर तुमचं डोकं शांत ठेवलं, तर शरीर देखील निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. मनातल्या भावना कुणाजवळ तरी बोलून दाखवणे तुम्हाला मानसिक आजारातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करेल.
ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीतून बाहेर पडता येत नसेल किंवा त्या संकटाशी कसे तोंड द्यावे समजत नसेल, तर आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी नक्की बोलून पाहा.
तुम्हाला तुमच व्यक्त होणं एक वेगळी वाट नक्की दाखवून जाईल. व्यायाम करणे नक्कीच तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यास मदत करते. शारिरीक आरोग्य तुमच्या मानसिक आरोग्याला सकारात्मक ठेवण्यास नक्कीच मदत करते.
चिंतन, व्यायाम, योगासने या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाला काळजीविरहित ठेवायला मदत करते. त्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सक्रिय राहा.
चांगला आहार घ्या आणि भरपर पाणी प्या : – ज्याचे पोट भरलेले असते त्याचे मन भरलेले असते, पण तेच पोट पौष्टिक गोष्टीने भरले, तर मन आनंदी नक्कीच राहू शकते. मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर स्वतःच्या जेवणावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.
आहारमध्ये फळे, भरपूर पालेभाज्या, डाळी, ड्रयफ्रुटस जे मेंदूसाठी चांगले असतात यांचा समावेश योग्य आणि माफकरित्या केला, तर नक्कीच मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होईल. सर्वांत म्हहत्त्वाचे भरपूर पाणी पिणे. शरीराला अन्नाबरोबर भरपूर पाण्याची गरज असते आणि हीच पूर्ण गरज तुम्हाला मन शांत ठेवायला मदत करते.
स्वतःला आनंद मिळेल असे काम करा : – स्वतःच्या आवडीचे काम करणे प्रत्येक माणसाला आमंदी करते. स्वतःच्या आवडीचे काहीतरी करणे आणि त्यात यश मिळवणे नक्कीच तुमचं मानसिक आरोग्य चांगले ठेवायला मदत करू शकते.
स्वतःचे आवडीचे छंद जोपासणे आणि त्यात गुंतणे नक्कीच तुम्हाला एक वेगळा आनंद देऊन जाईल. मनापासून एखादी गोष्ट तुम्ही करत असाल, तर तुम्हाला ती गोष्ट नैराश्यापासून दूर राहण्यास मदत करते. त्यामुळे स्वतःला आणि मनाला आनंदी ठेवेल अशा गोष्टी नक्की करा आणि आनंदी राहा.