भारी !! तीन मित्र एकत्र आले, इंस्टाग्रामवर शूज विकून उभी केली 100 कोटींची कंपनी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success story : प्रयत्न करणारांना यश नक्कीच मिळते असे म्हटले जाते. त्यासाठी जिद्द, योग्य मार्गाने होणारे प्रयत्न आदी गोष्टी महत्वपूर्ण असतात. आज आपण या ठिकाणी अशी एक सक्सेस स्टोरी पाहणार आहोत की जेथे काही तरुणांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या मदतीने 100 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे.

Crepdog Crew या कंपनीविषयी तर आपण नक्कीच ऐकले असेल. हा एक Clothing & E-Commerce Startup आहे. अंचित कपिल, भरत मेहरोत्रा ​​आणि शौर्य कुमार या तीन मित्रांनी इंस्टाग्राम पेजवर हा स्टार्टअप सुरु केला होता.

 Instagram वरून बिझनेसला सुरवात

2019 मध्ये अंचित, भरत आणि शौर्य या तिन्ही मित्रांनी व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यातूनच Crepdog Crew ची सुरवात झाली. त्यांनी सुरवातीस Premium Sneakers व Streetwears विकण्यास सुरुवात केली.

ऑनलाईन प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांनी Crepdog Crew नावाने त्यांनी इंस्टाग्राम पेज तयार केले. त्यांना त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या Sneakers व Streetwears ला चांगली डिमांड वाढली.

 दिल्लीत ओपन केलं पहिलं स्टोअर

इंस्टाग्राम वर चांगला रिस्पॉन्स मिळाल्याने त्यांनी दिल्लीत एक फिजिकल स्टोअर ओपन केलं. सध्या हजारो लोक तेथे खरेदीसाठी येतात. आता त्यांना मुंबईत आपली दुसरी आउटलेट ओपन करायची आहे.

100 कोटींची कंपनी केली उभी

कंपनी सुरवातीपासूनच प्रॉफेटमध्ये होती. Instagram च्या योग्य वापराने कंपनी अधिकच प्रोफ़ेटेबल बनली. राहुल कायन, हरमिंदर साहनी, निखिल मेहरा आदी गुंतवणूकदारांकडून चांगले फंडिंगही मिळाले आहे. एका रिपोर्टनुसार ही कंपनी आज १०० कोटींची बनली आहे.