भारी ! व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर, आता डेस्कटॉपवरच होईल व्हॉईस, व्हिडिओ कॉल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  गुरुवारी व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले की त्याने आपल्या डेस्कटॉप अ‍ॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुरुवात केली आहे. यामध्ये , यूजर्स त्यांच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पीसीद्वारे कॉल करण्यास सक्षम असतील.

कंपनीने म्हटले आहे की प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल एंड टू एंड इनक्रिप्टेड केले गेलेले आहेत आणि म्हणून व्हॉट्सअॅप त्यांना ऐकू किंवा पाहू शकत नाही, की हे कॉलिंग फोन किंवा संगणकाद्वारे केले गेले आहेत.

ग्रुप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलचे फीचर येईल :- कंपनीने पुढे म्हटले आहे की ते व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅपवर वन टू वन कॉल सुरू करत आहेत जेणेकरून ते यूजर्सना उत्तम आणि हाई क्लाविटीचा अनुभव देऊ शकतील. भविष्यात ग्रुप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल समाविष्ट करण्यासाठी ते या फीचरचा विस्तार करतील.

व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, गेल्या एका वर्षात एकमेकांना कॉल करणार्‍यांच्या संख्येत भरीव वाढ झाली आहे आणि बर्‍याचदा लोकांमध्ये दीर्घ संभाषणे होतात. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की गेल्या वर्षी नवीन वर्षाच्या संध्याकाळी त्यांनी 1.4 अब्ज व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्यात आले. एकाच दिवसात सर्वाधिक कॉल केल्याचा विक्रम मोडला गेला.

कंपनीने म्हटले आहे की डेस्कटॉप कॉलिंग अधिक उपयुक्त करण्यासाठी, कंपनीने पोर्ट्रेट आणि लँडस्केप ऑरिएंटेशनसाठी संगणक स्क्रीनवर कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करण्याचे सुनिश्चित केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24