Hero Karizma XMR 210 Combat Edition : ऑटो एक्सपो 2025 मध्ये हीरो एक्सपुल्स 210 लाँच केल्यानंतर, कंपनी आता करिझ्मा एक्सएमआर 210 आणण्याची तयारी करत आहे. हीरो मोटोकॉर्पने त्याच्या सोशल मीडियावर हीरो कारिझ्मा एक्सएमआर 210 ला टिज केले आहे, ज्यात हे मॉडेल लवकरच भारतात लॉन्च होणार असे सांगितले गेले आहे.
आता भारतात लवकरच ही गाडी लॉन्च होणार हे स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे बाईक प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. करिझ्मा एक्सएमआर 210 चा हा आगामी प्रकार सर्वात प्रीमियम प्रकार असेल, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
दरम्यान आज आपण हिरो कंपनीच्या या अपकमिंग बाईकचे वैशिष्ट्य काय असू शकतात, या बाईकमध्ये नेमके काय फीचर्स मिळतील, याची किंमत किती असू शकते, याची लॉन्चिंग डेट काय असेल? अशा विविध बाबींची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
स्टॅण्डर्ड करिझ्मा XMR च्या तुलनेत, कॉम्बॅट एडिशनला पिवळ्या ॲक्सेंटसह एक नवीन ग्रे कलर स्कीम देण्यात आली आहे, ज्यामुळे त्याचा लुक पूर्वीपेक्षा अधिक जबरा दिसतो. कंपनी ही गाडी अतिशय शक्तिशाली आणि प्रीमियम बनवणार असे बोलले जात आहे.
या नवीन आवृत्तीत सोनेरी रंगाचे USD (अपसाइड डाउन) फ्रंट फॉर्क्स असतील, जे स्टॅण्डर्ड करिझ्मा XMR च्या नियमित टेलिस्कोपिक फॉर्क्सपेक्षा चांगले कार्यप्रदर्शन देणार आहेत. कंपनीने या नवीन बाईक मध्ये नवीन TFT स्क्रीन जोडले आहे.
यामुळे ही गाडी आणखी ऍडव्हान्स आणि टेक्नॉलॉजी फ्रेंडली बनली आहे. बाईकच्या इंजिन बद्दल आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर या बाईक मध्ये आधीच्या मॉडेल प्रमाणेच इंजिन दिले जाणार आहेत. यामुळे या बाईकचा परफॉर्मन्स आधीच्या बाईक प्रमाणेच राहील असे बोलले जात आहे.
बाइकमध्ये पूर्वीप्रमाणेच 210cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन असेल, जे 25bhp पॉवर आणि 20Nm टॉर्क जनरेट करेल. हे 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले राहणार आहे.
यात ट्विन-प्रोजेक्टर एलईडी हेडलाइट्स, वक्र आणि एरोडायनॅमिक बॉडी पॅनल्स, सेंटर-सेट फूटपेगसह स्पोर्टी एर्गोनॉमिक्स, स्टँडर्ड मॉडेल ब्रेकिंग सिस्टम, टायर आणि अलॉय व्हील सारखे फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
मंडळी सध्या भारतीय बाजारात जी Hero Standard Karizma XMR आहे तीची किंमत 1.81 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. परंतु, नव्या कॉम्बॅट एडिशनमधील नवीन हार्डवेअर आणि वैशिष्ट्यांमुळे, नवीन बाईकची किंमत यापेक्षा जास्त असू शकते.
किंमत नेमकी किती राहणार याबाबत अजून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र लवकरच किमती बाबतही खुलासा होणार आहे. तसेच ही गाडी या नव्या वर्षात म्हणजेच 2025 अखेरपर्यंत भारतीय मार्केटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. तथापि या गाडीची लॉन्चिंग नेमकी कधी होणार ? ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.