Highways Number:- भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महामार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. भारतात जम्मू पासून तर दक्षिणेतील कन्याकुमारी पर्यंत तर पश्चिमे पासून ते पूर्वेपर्यंत भारतामध्ये महामार्गाचे जाळे पसरले आहे.
या महामार्गाच्या माध्यमातून औद्योगिक, कृषी विकासामध्ये फार मोठा हातभार लागतो. देशामध्ये महामार्गांचे जाळे जितके विस्तीर्ण असेल तितके देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणे येणे सोपे होते. जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये नॅशनल हायवे 44 असून हा सर्वात मोठा महामार्ग आहे व त्याची लांबी 4112 किलोमीटर आहे.
हा महामार्ग जम्मू काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत जातो. तसेच आपण बऱ्याचदा पाहतो की वेगवेगळ्या महामार्गांना वेगवेगळी नावे व नंबर दिलेली असतात. पुढे बऱ्याचदा आपल्या मनात येत असेल की नेमकी महामार्गांना नावे कशी पडतात? त्यांना नंबर का दिलेले असतात? त्यामुळे या लेखामध्ये आपण याविषयीची माहिती घेणार आहोत.
महामार्गांना नावे कशी दिली जातात?
आपल्याला माहित आहे की भारतातील जे काही राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांची देखभालीचे काम हे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयकडे आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशातील राष्ट्रीय महामार्गाची संबंधित सर्व बाबी पाहिल्या जातात व देशातील राष्ट्रीय महामार्गांचे नामकरण करण्यासाठी एक विशेष नियम या माध्यमातून पाळला जातो. यावरून आपल्याला देशाच्या कोणत्या भागामध्ये विशिष्ट महामार्ग आहे याचा अंदाज फक्त त्याच्या क्रमांकावरून देखील लावता येतो.
भारतातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे महामार्ग
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्व महामार्गांना सम क्रमांक आहेत. म्हणजेच समसंख्या आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर दोन, आठ आणि 44 हे होय. या महामार्गांची संख्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत्या क्रमांकांनी दिली जाते.
उदाहरणार्थ ईशान्येकडील राज्यांमध्ये असलेल्या महामार्गांची संख्या कमी असेल तर गुजरात व राजस्थान यासारख्या राज्यातून जाणाऱ्या महामार्गांची संख्या जास्त असेल असे यामध्ये गृहीत धरले ईशान्य कडील आसाम, मिझोराम, मणिपूर आणि नागालँड या राज्यांमधून महामार्ग क्रमांक दोन जातो तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 68 आणि 70 राजस्थानमध्ये जातो. या उलट जर तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या सर्व महामार्गांचा विचार केला तर या महामार्गांना विषम संख्या देण्यात आलेले आहेत.
यामध्ये जसे की एक, 3,17 आणि 77. जेव्हा तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाल तेव्हा या राष्ट्रीय महामार्गांच्या संख्येत वाढ होते. म्हणजेच जम्मू काश्मीर मधून एक क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो तर 19 क्रमांकाचा बिहार आणि उत्तर प्रदेश मधून जातो तर 87 क्रमांकाचा महामार्ग तामिळनाडू राज्यातून जातो.
राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक महामार्ग
तसेच देशामध्ये अनेक सहाय्यक महामार्ग देखील आहेत व त्यांना दोन ऐवजी तीन अंक देण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक महामार्ग 301, 501,701 आणि 701A अशा प्रकारचे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग 28 चे सहाय्यक महामार्ग 128,128A, 128C, 128D, 328,328A अशा पद्धतीचे क्रमांक देण्यात आलेले आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशातील सर्व प्रमुख महामार्गांचा विचार केला तर त्यांची संख्या सम मध्ये 70 आणि विषम मध्ये 87 पर्यंत आहे.