स्पेशल

होम लोन अन कार लोन घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर बँक कोणाकडून वसूल करते कर्जाची रक्कम ? बँकेचे नियम काय सांगतात

Published by
Tejas B Shelar

Home Loan And Car Loan : आजच्या काळात कर्ज घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. अलीकडे विविध गोष्टींसाठी कर्ज घेतले जाते. अहो साधा मोबाईल जरी घ्यायचा असला तरी देखील हप्त्यावर म्हणजेच कर्जावर घेतला जातो.

बँका देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ताबडतोब कर्ज ऑफर करत आहेत. आता बँकांकडून सहजतेने कर्ज उपलब्ध होत असल्याने कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोक त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात.

घर, कार किंवा वैयक्तिक खर्च इत्यादींसाठी लोक बँकांकडून कर्ज घेत आहेत. या कर्जांवर बँका व्याजही आकारतात. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला दरमहा त्याचे हप्ते म्हणजे EMI भरावे लागतात. पण, कोणत्याही व्यक्तीला कर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक त्याच्या आर्थिक इतिहासाची चौकशी करते.

पूर्ण खात्री दिल्यानंतरच बँक त्या व्यक्तीला कर्ज देते. अशा या परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सदर कर्जाची जबाबदारी कोणाची? बँक अशा परिस्थितीत कोणाकडून कर्जाची रक्कम वसूल करते?

असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. याबाबत आरबीआयचे नेमके काय नियम आहेत ? याविषयी आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

नियम काय सांगतात ?

टाटा कॅपिटलच्या म्हणण्यानुसार, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्यास, बँक सह-अर्जदाराशी संपर्क साधते. बँकेकडून सह अर्जदाराकडून कर्जाची रक्कम वसूल केली जाते. पण जर सह-अर्जदार कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसल्यास बँक जामीनदार, कुटुंबातील सदस्य किंवा मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांशी संपर्क साधते आणि त्यांना उर्वरित रक्कम भरण्यास सांगते.

यापैकी कोणीही कर्ज फेडण्यास असमर्थ असल्यास, बँक मृत व्यक्तीची मालमत्ता जप्त करू शकते आणि त्याची विक्री करून थकित कर्जाची रक्कम वसूल करू शकते. गृहकर्ज किंवा कार लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँका त्याचे घर आणि कार जप्त करते.

बँकेचे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला जातो. लिलावात मिळालेल्या रकमेतून बँका त्यांची कर्जे वसूल करतात. त्याचप्रमाणे, इतर कोणत्याही कर्जाच्या बाबतीत, बँका मृत व्यक्तीची उर्वरित मालमत्ता देखील जप्त करू शकतात आणि त्याची विक्री करून कर्जाची रक्कम वसूल करू शकतात.

घराचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा लिलाव पाहणे हे कोणत्याही कुटुंबासाठी खूप कठीण असते. त्यामुळे लोकांनी किमान 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घ्यावा, जेणेकरून त्यांना काही झाले तर विम्याच्या रकमेतून कर्जाची परतफेड करता येईल.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar