Home Loan And Car Loan News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट दिली होती. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. रेपो रेट आरबीआयकडून 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.
म्हणजेच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात करण्यात आली आहे. अशातच आता पुन्हा एकदा आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट कमी करणार असल्याचे म्हटले जात होते.

म्हणजेच रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतात असा अंदाज बँकिंग सेक्टर मधील जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. दरम्यान तज्ज्ञांचा हा अंदाज आता सत्यात उतरला आहे.
आज अर्थातच 9 एप्रिल 2025 रोजी आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मिटींगचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात आरबीआय ने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. नवीन आर्थिक वर्षातील एमपीएससीची ही पहिलीच मीटिंग होती अन यामध्ये रेपोरेटच्या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे.
दरम्यान आरबीआयच्या या निर्णयानंतर होम लोन वरील व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. आरबीआयने रेपो रेट संदर्भात पुन्हा एकदा सकारात्मक निर्णय घेतला म्हणून आता होम लोन घेणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
व्याजदरात होणार मोठी कपात
आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेट कमी केलेत अन म्हणून आता होम लोनचे व्याजदर आठ टक्क्यांपेक्षा खाली येऊ शकतात. सध्या देशातील विविध बँकांच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना होम लोन 8.25 टक्क्यांपासून ते 8.75% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र आरबीआयच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर हे व्याजदर आठ टक्क्यांपेक्षा खाली येण्याची शक्यता आहे.
रेपो रेट कमी कां झालेत ?
रेपो रेट कमी का झालेत ? याबाबत जाणकार लोक असे सांगतात की, जेव्हा महागाईचा दर कमी असतो किंवा विकासाचा दर मंदावतो तेव्हा RBI कडून काही धोरणात्मक निर्णय घेतले जातात.
बँकिंग सिस्टीम मधील लिक्विडिटी वाढवण्याचा प्रयत्न होतो आणि यासाठी रेपो दरात कपात केली जाते. दरम्यान याचं दोन्ही गोष्टी पाहता आरबीआय कडून पुन्हा एकदा रेपो दर कमी करण्यात आले आहेत.
खरेतर, याचं दोन्ही गोष्टी विचारात घेऊन अर्थतज्ज्ञ आणि मार्केटमधील जाणकार लोकांकडून नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एमपीसी मीटिंगमध्ये रेपो दरात 25 बेसिस पॉइंटने कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान तज्ञांचा हा अंदाज आता खरा ठरला असून रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा कपात झाली आहे.
काय फायदा होणार ?
आरबीआयने 9 एप्रिल 2025 रोजी रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा 25 बेसिस पॉईंट ने कपात केली आहे अन आता याचा फायदा असा होईल की होम लोन च्या व्याज दरात कपात होऊ शकते.
यामुळे नवीन होम लोन घेणाऱ्या नागरिकांना तसेच फ्लोटिंग रेटने आधीच होम लोन घेतलेल्या ग्राहकांना फायदा मिळणार आहे. ग्राहकांना यामुळे कमी व्याजदरात होम लोन मिळणार आहे. यामुळे मिड रेंज आणि लक्झरी घरांच्या खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.