स्पेशल

होम लोन घेताय ना ! मग यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Home Loan : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा. यासाठीच आपण दिवस-रात्र काबाडकष्ट करत असतो. अलीकडे मात्र निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कारण की, वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती वाढत आहेत.

सिमेंट, स्टीलचे वाढलेले भाव तसेच पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव पाहता आता घर बांधणे किंवा तयार घर विकत घेणे मोठे जीकेरीचे बनले आहे. आता घरांसाठी नागरिकांना अधिकचा पैसा मोजावा लागत आहे. साहजिकच यामुळे आता घर घेण्यासाठी होम लोन चा पर्याय पुढे येत आहे.

अनेक लोक होम लोन घेऊन घरांची बांधणी करत आहेत. दरम्यान, आज आपण होम लोन घेताना कोणत्या बाबींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवला पाहिजेत जेणेकरून नुकसान होणार नाही याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘हा’ 37 रुपयाचा स्टॉक पोहचला 490 रुपयांवर; वाचा स्टॉकची सविस्तर माहिती एका क्लिकवर

होम लोनचे प्रकार 

होम लोन हे फक्त नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठीच काढल जातं असं नाही. होम लोनचे अनेक प्रकार आहेत. यात नवीन घर खरेदी करण्यासाठी, घर बांधकामासाठी, घरासाठी जागा खरेदी करण्यासाठी, घराचा विस्तार करण्यासाठी, घराचे रिनोवेशन करण्यासाठी, टॉप अप होम लोन अर्थातच आधीच्या होम लोन वर कर्ज, एनआरआय होम लोन यानुसार होम लोनचे प्रकार पडतात.

होम लोनसाठी पात्रता कशी ठरवली जाते?

होम लोनसाठी कमी वय असलेल्या लोकांना लवकर मिळते.

पगार तारखे व स्वतःचा रोजगार असलेल्या लोकांना लवकर होम लोन मिळते.

चांगला सिबिल स्कोर असला म्हणजेच सिबिल स्कोर 750+ असला तर अशा लोकांना लवकर होम लोन मिळतं. 

हे पण वाचा :- पुणे, लोणावळ्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-लोणावळा लोकलच्या वेळेत होणार बदल? कस राहणार नवीन वेळापत्रक, पहा….

होम लोन म्हणून किती रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते?

हा लोकांच्या माध्यमातून सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न. तर याचे उत्तर असे की, घराच्या एकूण किमतीच्या 80 ते 90 टक्के इतकी रक्कम कर्ज स्वरूपात कर्जदाराला मिळू शकते. नोंदणी, हस्तांतरण आणि मुद्रांक शुल्कचा यामध्ये मात्र समावेश असतो

तुमचा जो मासिक पगार असतो त्यापैकी 50% रक्कम तुम्ही कर्जाच्या हप्ता पोटी भरणार अशी तुमची क्षमता गृहीत धरली जाते आणि त्यानुसार कर्ज मंजूर होत.

एकंदरीत तुमच्या उत्पन्नावर तुमचे होम लोन अवलंबून असते. तुमचे जेवढे अधिक उत्पन्न असेल तेवढे अधिक होम लोन तुम्हाला मंजूर होऊ शकते.

होम लोन साठी आवश्यक कागदपत्रे

होम लोन घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट/ मतदार ओळखपत्र / चालक परवाना, नियुक्ता ओळखपत्र, सॅलरी स्लिप, व्यवसाय पत्त्याचा पुरावा, व्यवसाय परवाना कागदपत्रे, पत्ता पुरावा म्हणून वीज बिल, मालमत्ता कर कागदपत्रे, पोस्टपेड मोबाइल बिल, पासपोर्ट आकाराचा फोटो, फॉर्म १६ किंवा आयकर रिटर्नसह 6 महिन्यांचे जुने बँक स्टेटमेंट यांसारखे कागदपत्रे होम लोन घेणाऱ्या व्यक्तीला सादर करावे लागतात.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आरोग्य विभागात मोठी भरती; ‘या’ पदाच्या 4751 पदे भरली जाणार, वाचा सविस्तर

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts