Home Loan : आयुष्यात कितीही पैसा कमवा पण स्वतःचे घर नसेल तर तुमची समाजात ओळख तयार होणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात घराला विशेष स्थान आहे. घर खरेदी करणे हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक मोठा क्षण असतो.
म्हणूनचं घरासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सहजतेने घर खरेदी करता येत नाही. घरासाठी मोठी मेहनत घ्यावीच लागते, अनेकदा तर कित्येक आटापिटा करूनही घर तयार करता येत नाही.
अशावेळी मग सर्वसामान्य नागरिक होम लोन घेऊन घराचे स्वप्न साकार करतात. पण अशा या परिस्थितीतच अनेकांच्या माध्यमातून त्यांच्या पगारानुसार त्यांना किती होम लोन मंजूर होऊ शकत? असा सवाल उपस्थित केला जातो.
दरम्यान आज आपण याचाचं सविस्तर आढावा घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 50 हजार रुपये असेल तर त्याला किती होम लोन मंजूर होऊ शकतं? हेच आज आपण समजून घेणार आहोत.
खरे तर गृह कर्ज देताना वित्तीय संस्था अन बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या बाबी तपासल्या जातात. कर्ज घेणाऱ्याची परतफेड करण्याची क्षमता, त्याचे मासिक उत्पन्न, त्याचा सिबिल स्कोर तथा अन्य महत्वाचे डॉक्युमेंट्स तपासले जातात.
यानंतर मग बँकांच्या माध्यमातून ग्राहकाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. दरम्यान आज आपण कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मासिक उत्पन्नाच्या आधारावर त्याला नेमकं किती कर्ज मंजूर होऊ शकतं हे जाणून घेऊयात.
मंडळी, बँक बाजाराच्या गणनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार हा 50,000 रुपये असेल अन त्याला त्याच्या मासिक पगारावर 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचे असेल तर त्याला 32 लाख 24 हजार 563 रुपये गृह कर्ज मिळू शकते.
मात्र यासाठी त्या व्यक्तीवर आधीच थकीत कर्ज नसावे. कर्ज थकीत नसेल तर एवढी रक्कम तुम्हाला होम लोन म्हणून मिळू शकते. तसेच, जर दहा वर्ष कालावधीसाठी 50 हजार रुपये पगार असलेल्या लोकांनी गृह कर्ज घेतले तर त्यांना कमाल 21 लाख 53 हजार 159 रुपये गृह कर्ज मंजूर होऊ शकते.
शिवाय जर 50000 पगार असणाऱ्या लोकांनी 15 वर्षांसाठी गृह कर्ज घेतले तर त्यांना 27 लाख 81 हजार 399 रुपये एवढे कर्ज मंजूर होऊ शकते. पण, कर्ज मंजूर करताना उत्पन्नासोबतच सदर ग्राहकाचा क्रेडिट स्कोरसारख्या विविध बाबी तपासल्या जातात.