Home Loan : घर खरेदी करणे, आपले स्वतःचे घर बांधणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी एक मोठे स्वप्न असते. यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. परंतु, हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारा पैसा प्रत्येकालाच बचत करून जमवता येत नाही.
मग अशा परिस्थितीत आपल्यापुढे एकच पर्याय उभा राहतो आणि तो पर्याय म्हणजे गृह कर्ज. सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी करताना किंवा बांधताना गृह कर्जाची आवश्यकता भासते. अशावेळी मग पगारानुसार व्यक्तीला किती गृह कर्ज मिळू शकते असाही प्रश्न अनेकांना पडतो.
म्हणून जर आपला पगार दरमहा 20,000 रुपये असेल आणि आपण या पगारावर गृह कर्ज मिळवू इच्छित असाल तर आपणास नेमके किती गृह कर्ज मिळू शकते? याच संदर्भात आज आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात, आम्ही आपल्याला २०,००० रुपये पगार असल्यास किती कर्ज मिळणार ? होम लोन च्या ईएमआयची गणना इत्यादी मुद्द्यांची तपशीलवार माहिती घेणार आहोत.
जेव्हा आपण गृह कर्ज घेण्याचा विचार करतो तेव्हा सर्व प्रथम आपल्या पगाराच्या आधारे बँक आणि वित्तीय संस्था किती कर्ज देतील हे समजून घेणे महत्वाचे आहे. मंडळी, गृह कर्जाची रक्कम सहसा आपल्या मासिक उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, कर्ज कालावधी आणि इतर आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते.
जर आपला पगार दरमहा 20,000 रुपये असेल गृह कर्जाची रक्कम आपली पात्रता आणि आपण कितीचा ईएमआय परतफेड करण्यास तयार आहात यावर अवलंबून असेल. सामान्यत: बँका आणि वित्तीय संस्था आपले मासिक उत्पन्न 50-60%पर्यंत ईएमआय म्हणून काढण्याची परवानगी देतात.
या आधारावर, जर आपला पगार 20,000 रुपये असेल तर आपण सुमारे 10,000 ते 12,000 रुपयांपर्यंत ईएमआय भरू शकता. जर आपण 10,000 ते 12,000 रुपयांपर्यंत ईएमआय देण्यास सक्षम असणार तर बँका आपल्याला 10 ते 15 लाख रुपयांचे गृह कर्ज देऊ शकतात.
म्हणजे वीस हजार पगारा असणाऱ्याला दहा ते पंधरा लाख रुपयांचे गृह कर्ज मिळू शकते. पण आपल्या कर्जाचा कालावधी आणि व्याज दराच्या आधारावर ही रक्कम बदलू सुद्धा शकते. आता आपण जर एखाद्या व्यक्तीला 10 अन 15 लाखाचे होम लोन मिळाले तर त्याला किती एमआय भरावा लागणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
एखाद्या व्यक्तीला जर दहा लाख रुपयांचे होम लोन वीस वर्ष कालावधीसाठी आठ टक्के व्याजदराने मंजूर झाले तर अशा व्यक्तीला आठ ते नऊ हजार रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीला 15 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षे कालावधीसाठी 8.5% व्याजदराने मंजूर झाले तर अशा व्यक्तीला 11500 ते 12 हजार रुपये महिना एवढा हप्ता भरावा लागणार आहे.