Marathi News : माणसाच्या पूर्वजांची शेपूट कशी गायब झाली? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. विज्ञानाच्या अभ्यासात याचे ठोस पुरावे मिळाले आहेत.
यात एका विशेष जीनमुळे असे बदल झाले असून त्यांनी एका प्रयोगात हे सिद्धही करून दाखवले. खरेच माणसाला शेपटी होती का? याचे उत्तर होय आहे आणि याबद्दलचे पुरावेही मिळाले आहेत.
पण ही शेपूट गायब कशी झाली? हा प्रश्न अधिक जटिल आहे आणि याचे उत्तर शास्त्रज्ञ अनेक शतकांपासून शोधत आहेत. मात्र विशेष जीनने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. एका प्रयोगात त्यांना याची सर्व उत्तरे मिळाली. तसेच यावेळी माणूस कोट्यवधी वर्षांपूर्वी कशा प्रकारे झाडावरून जमिनीवर राहू लागले आणि त्यांची शेपूट गायब कशी झाली याची माहितीही समोर आली आहे.
शेपटी पक्षी-प्राण्यांमध्ये एक महत्वाचा भाग असते, त्यामुळे त्यांना आपल्या शरीराचे संतुलन ठेवता येते आणि त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठीही शेपटी मदत करत असते. हे संचाराचे एक साधन आहे. काही प्रजातींमध्ये शरीराचे तापमान कायम ठेवण्यासाठी किंवा धोक्यांविरोधात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या शेपटीचा वापर पशु-पक्षी करतात. मात्र दुसरीकडे माणूस या स्तनधारी प्राण्याची शेपूट अनेक पिढ्यांपूर्वीच गायब झालेली आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या पूर्वजांनी चार पायावरून दोन पायांवर चालणे सुरू केले आणि हा सर्वात मोठा बदल आहे. हा तो काळ आहे ज्यावेळी माणूस झाडे सोडून जमिनीवर राहू लागला होता. एका टी बीएक्सटी नावाच्या जीनमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले, त्यामुळे आपली शेपूट गायब झाल्याचे मानले जाते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
हा बदल डीएनएचा छोटाचा भाग असलेल्या एएल्यूवाय तत्त्वाच्या या जीनमध्ये घुसल्याने झाला होता आणि हे सर्व कोट्यवधी वर्षांपूर्वी झाले होते.
या डीएनएने सरळ जीन कोडमध्ये बदल केला नाही, मात्र त्याने जीनची काम करण्याची पद्धत मात्र बदलून टाकली.
हे समजण्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदरात टीबीएक्सटी जीनचा बदल केला आणि परिणाम चकित करणारे होते. काही उंदरांची शेपटीही छोटी झाली तर काही विनाशेपटीचे जन्मले.