स्पेशल

किती दिवस असतो शनिच्या साडेसातीचा परिणाम? कशाप्रकारे दिवसानिहाय व्यक्तीवर होत असतो परिणाम? वाचा संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

शनिची साडेसाती म्हटले म्हणजे भल्या भल्यांच्या अंगावर काटा फुटतो. जर आपण शनिदेवाच्या अनुषंगाने बघितले तर त्यांना न्यायाची देवता म्हणून ओळखले जाते व ज्योतिषशास्त्रानुसार ते एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतात. साडेसातीचे जर स्वरूप बघितले तर शनी जेव्हा एखाद्या राशीमध्ये संक्रमण करतात तेव्हा त्या राशीच्या एक राशी अगोदर आणि एक राशी नंतर अशा लोकांवर साडेसातीचा प्रभाव सुरू होतो असे वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले आहे.

सध्या जर शनी यांची राशी मधील स्थिती पाहिली तर 17 जानेवारी 2023 रोजी शनीने कुंभ राशीत प्रवेश केलेला होता व तेव्हापासून शनि याच राशीत आहेत व 29 मार्च 2025 रोजी शनीचे राशी परिवर्तन म्हणजे राशीत बदल होणार आहेत.

सध्या मकर राशि वर शनीची साडेसाती सुरू असून ती 29 मार्चला संपणार आहे. तर कुंभ राशी वर साडेसातीचा दुसरा चरण सुरू आहे व साधारणपणे 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत कुंभ राशीवर शनीची साडेसाती संपणार आहे.

 किती दिवस असतो शनीच्या साडेसातीचा प्रभाव?

साधारणपणे वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, एका राशीमध्ये जर शनीने साडेसाती सुरू केली किंवा सुरू झाली तर त्याचा प्रभाव 2737 दिवसांपर्यंत तसाच राहतो. दिवसानिहाय यामध्ये आठ विभाग करण्यात आलेले आहेत व विभागानुसार या साडेसातीचा प्रभाव वेगवेगळा असतो. तो जर बघितला तर….

1- एक ते शंभर दिवसांचा कालावधी या कालावधीमध्ये व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर धनहानी होते व व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर देखील विपरीत परिणाम होतो.

2- 101 ते 500 दिवस या कालावधीत साडेसातीचा प्रभाव काहीसा लाभदायक किंवा समाधानकारक असतो. या कालावधीमध्ये एखाद्या व्यावसायिक व्यक्तीच्या व्यवसायामध्ये बदल करण्याची संधी त्याला मिळते.तसेच त्याचे आरोग्य देखील चांगले राहते.

3- 501 ते 912 दिवस या कालावधीमध्ये व्यक्तीला अनेक धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येतो. परंतु या कालावधीमध्ये संबंधित व्यक्तीला शत्रूची भीती तसेच आर्थिक दृष्टिकोनातून खूप ताण सहन करावा लागतो.तसेच ग्रह क्लेश देखील संभवतो.

4- 913 ते 1600 दिवस या कालावधीत साधारणपणे व्यक्तीला घर सोडावे लागते व समाजात मोठा अपमान सहन करावा लागू शकतो. या कालावधीमध्ये व्यक्तीपासून मित्रपरिवार देखील दुरावतो.

5- 1601 ते 1825 दिवस हा कालावधी खूप विचित्र पद्धतीचा असतो व यामध्ये व्यक्तीला अपमान तसेच कष्ट, रोगाचा प्रादुर्भाव तसेच आर्थिक चणचण यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

6- 1826 ते 2300 दिवस या कालावधीमध्ये मात्र व्यक्तीला धनप्राप्ती होते. परंतु कौटुंबिक किंवा दांपत्य जीवनामध्ये काही वाद देखील निर्माण होऊ शकतात.

7- 2301 ते 2500 दिवस या कालावधीमध्ये शनीच्या साडेसातीचा चांगला फायदा मिळू शकतो व हा सर्वात चांगला कालावधी समजला जातो. कालावधीमध्ये व्यक्तीच्या प्रगतीत वाढ होते व सौभाग्यात देखील वाढ होऊन कामामध्ये स्थिरता प्राप्त होते.

8- 2501 ते 2737 दिवस हा कालावधी जरा त्रासदायक असतो व यामध्ये शारीरिक त्रास म्हणजे कष्ट तसेच आजार, काही गोष्टींमधील वाद तसेच संपत्तीची हानी इत्यादी मुळे जीवनात एकाकीपणा येतो व महत्वाचे म्हणजे हा शेवटचा कालावधी असतो व 2737 दिवसानंतर शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपतो.

( टीप वरील माहिती ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली असून या संबंधित कुठल्याही प्रकारचे समर्थन व दावा आम्ही करत नाहीत.)

Ajay Patil