स्पेशल

देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण ठरत आहेत वंदे भारत ट्रेन! आज देशामध्ये किती धावतात वंदे भारत ट्रेन? पहिली ट्रेन कधी आणि कुठे धावली?

Published by
Ajay Patil

Vande Bharat Train:- वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या दृष्टिकोनातून देशातील विविध महत्त्वाच्या अशा शहरांना उत्तम अशी कनेक्टिव्हिटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रवाशांना दिलासा मिळावा याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या असून आज ज्या ठिकाणी देशात वंदे भारत ट्रेन सुरू आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

टप्प्याटप्प्याने देशातील महत्त्वाच्या शहरादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत असून पहिल्या वंदे भारत ट्रेनची सुरुवात झाल्यापासून देशातील अनेक मार्गांवर सध्या वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.

वंदे भारत ट्रेनची सुरुवात ही मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली असून जर आपण बघितले तर या ट्रेनच्या माध्यमातून देशातील 280 पेक्षा अधिक जिल्हे जोडले गेलेले आहेत.

देशामध्ये किती धावतात वंदे भारत ट्रेन?
देशामध्ये एकूण धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या बाबतीत खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिलेली आहे. त्यांनी म्हटले की, 21 नोव्हेंबर पर्यंत जवळपास 136 वंदे भारत ट्रेन सध्या देशातील विविध मार्गांवर कार्यरत असून प्रवाशांना सुरक्षा वैशिष्ट्य आणि आधुनिक प्रवासी सुविधा देत आहेत.

वंदे भारत ट्रेनच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये अनेक स्वयंचलित संरक्षण प्रणाली देण्यात आले असून अनेक सोयी सुविधा देखील आहेत.इतकेच नाहीतर सध्या सुरू असलेल्या एकूण वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून देशातील जवळपास 280 पेक्षा अधिक जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.

काय आहेत वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये?
वंदे भारत ट्रेनची सुरुवात किंवा निर्मिती जर बघितली तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेतून करण्यात आली असून ही भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड रेल्वे म्हणून देखील ओळखले जाते.ही पूर्णपणे विजेवर धावणारी रेल्वे आहे.जर अगोदरच्या रेल्वेचे इंजिन बघितले तर ते लोकोमोटिव्ह प्रकाराचे होते.

म्हणजेच यामध्ये वेगळे इंजिन आणि त्याला जोडलेले डबे असे एकंदरी त्याचे स्वरूप होते. परंतु आता जगात अशा इंजिनची जागा इंजिनरहीत तंत्रज्ञानाने घेतली आहे.

तसेच डब्यांच्या खाली रचना देखील बदलण्यात आल्याने पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी यामध्ये जास्त जागा उपलब्ध होते. तसेच ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे लावलेले आहेत व त्याचे नियंत्रण रेल्वेच्या चालकाकडे असते.

पहिली वंदे भारत कधी आणि कोणत्या दोन शहरादरम्यान धावली?
15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला नवी दिल्ली येथील रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून तिचे उद्घाटन केले होते व ही पहिली वंदे भारत नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली होती.

दिल्ली ते वाराणसी हे 759 किलोमीटरच्या अंतर केवळ आठ तासात या ट्रेनने पूर्ण केले होते. हेच अंतर पार करण्यासाठी शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसला देखील 11 ते 11:30 तासांचा वेळ लागतो. वंदे भारतने हे अंतर आठ तासात पूर्णकरून या दोन्ही एक्सप्रेसचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

Ajay Patil