स्पेशल

पिकांसाठी कशी कराल कीटकनाशकांची निवड? काय होतो कीटकनाशकांवरील विविध रंगांच्या त्रिकोणाचा अर्थ? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

पिकांपासून भरघोस उत्पादन मिळावे याकरिता शेतकरी विविध प्रकारच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नियोजन करत असतात. जेव्हा सगळ्या बाजूने व्यवस्थापन हे योग्य व वेळेत होते तेव्हाच पिकांपासून आपल्याला भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते.

यामध्ये प्रामुख्याने पिकांवर विविध प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो व वेळीच अशा कीड व रोगाचा नियंत्रणासाठी अनेक प्रकारचे उपाययोजना कराव्या लागतात व यामध्ये पिकांवरची फवारणी ही खूप महत्त्वाची असते. फवारणीसाठी शेतकरी विविध प्रकारचे कीटकनाशक खरेदी करतात व त्यांचा वापर करतात.

बाजारामध्ये अनेक कीटकनाशके विक्रीसाठी उपलब्ध असतात व त्यामध्ये विक्रेते देतील तीच औषधे शेतकरी खरेदी करतात. परंतु यामध्ये शेतातील पिकांची परिस्थिती कशी आहे किंवा रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच आपल्याला किती तीव्रतेचे औषधे घ्यावीत हे देखील शेतकऱ्यांना माहिती असते तितकेच गरजेचे आहे. यासंबंधीचेच माहिती आपण थोडक्यात बघू.

 कीटकनाशकांची निवड कशी कराल?

जर आपण कीटकनाशकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे व त्या वर्गीकरणानुसार कीटकनाशकांचे धोक्याचे प्रमाण व पातळी त्यांच्या लेबलवरच दिलेली असते. साधारणपणे हे वर्गीकरण  Ia, Ib, II आणि III किंवा अवर्गीकृत असे असतात.

आपल्याला माहित आहे की कीटकनाशकांवर आपल्याला हिरवा तसेच निळा, पिवळा किंवा लाल त्रिकोण या स्वरूपात त्रिकोण दिसून येतात. या माध्यमातून त्या औषधांमध्ये विषाची मात्रा कशी आहे हे आपल्याला कळत असते. यामध्ये जर आपण लाल त्रिकोणाचे लेबल असलेले कीडनाशक बघितले तर त्याचा अर्थ हा अत्यंत विषारी असा होतो.

असे लाल त्रिकोण असलेले कीडनाशके अंतिम म्हणजे शेवटची उपाययोजना म्हणून वापरायचे असतात. कारण हे कीटकनाशक खूपच विषारी असतात व त्यांचा त्वचेला थोडासा जरी स्पर्श झाला तरी विषबाधा होऊ शकते. ज्या कीटकनाशकांवर पिवळा रंगाचा त्रिकोण असतो ते खूप विषारी असल्याचे दर्शवते व निळा त्रिकोण असलेले कीटकनाशक हे कमी विषारी असल्याचे आपल्याला दर्शवते.

त्यामुळे ही माहिती असणे खूप गरजेचे आहे. एवढेच नाहीतर कीटकनाशकांचे मिश्रण करताना, त्यानंतर फवारणी करताना योग्य संरक्षण साधनांचा वापर करणे देखील तितकेच गरजेचे असते. पिकांवर जर एखादा रोग आला असेल तर तो नेमका कशामुळे आला असावा व त्याचे लक्षण काय आहेत याची खात्री करूनच मग निवड करावी.

जसे की पिकांवरे रोग बुरशीजन्य किंवा जिवाणू, विषाणूजन्य रोग असू शकतात व त्यांच्या नियंत्रणाकरिता योग्य ते बुरशीनाशक तसेच जिवाणूनाशक यांची निवड करावी. तसेच एकाच प्रकारचे कीटकनाशकांचा वापर पिकांवर करू नये.

जर एकाच प्रकारची कीटकनाशक वापरली तर किडींमध्ये प्रतिकारक क्षमता विकसित होते व फवारणीचा कुठलाही फायदा होत नाही. याकरिता अलटून पालटून कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे असते. यामध्ये प्रामुख्याने…

 फंगी साईड हे बुरशी किंवा कवक नाशकासाठी वापरले जाते तर हर्बी साईड हे पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरले जाते तसेच इन्सेक्टीसाईड म्हणजेच कीटकनाशक पिकांवरील किड्यांचे नियंत्रणासाठी तर ब्रेमॅटीसाईड हे प्रामुख्याने सूत्रकृमी आणि रोडंटीसाईड हे प्रामुख्याने उंदीरांचा नियंत्रणासाठी वापरले जाते.

Ajay Patil