स्पेशल

बंदुकीचा परवाना कसा मिळवायचा ? कुठं अर्ज करावा लागणार ? वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Pistol License : भारतात तलवार, बंदूक यांसारखे कोणतेही शस्त्र वापरण्यास बंदी आहे. परवान्याशिवाय आपल्याकडे कोणतेही शस्त्र वापरणे गुन्हा आहे. अमेरिकेत मात्र बंदूक वापरणे गुन्हा नाही. आत्मसंरक्षणासाठी तेथील लोक विना लायसन्स बंदूक ठेवतात. म्हणजेच अमेरिकेत बंदूक वापरण्यासाठी लायसन्सची आवश्यकता भासत नाही. पण आपल्याकडे असे नाही.

जर भारतात एखाद्या व्यक्तीने विनापरवाना शस्त्र बाळगले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. यामुळे भारतात कोणीही विनापरवाना शस्त्र बाळगू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून आत्मसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना कसा मिळवायचा, यासाठी कुठे अर्ज करावा लागणार ?

असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे थोडक्यात उत्तर जाणून घेणार आहोत.

बंदुकीचा परवाना कसा मिळवता येईल ?

आपल्याकडे बंदुकीचा परवाना कोणालाही मिळत नाही. बंदुकीचा परवाना हा केवळ दोन कारणांसाठी दिला जातो. एक तर आत्मसंरक्षणासाठी आणि दुसरे म्हणजे शेती पिकांच्या रक्षणासाठी. यामुळे जर तुम्हाला आत्मसंरक्षणासाठी किंवा शेती पिकांच्या रक्षणासाठी बंदूक आवश्यक असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात.

यासाठी तुम्हाला पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गुन्हे शाखेत अर्ज सादर करावा लागतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, सर्व प्रकारच्या बंदुकीसाठी परवाना मिळत नाही. शॉर्ट गन, हॅन्डगन आणि स्पोर्टगन या तीन प्रकारच्या बंदुकी वापरण्यासाठीच फक्त परवाना दिला जातो.

अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात

बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो. यासोबत अर्जदाराला काही कागदपत्रे देखील द्यावे लागतात. यामध्ये ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो, मतदान ओळखपत्र, मागील तीन वर्षाचे आयटीआर इत्यादी कागदपत्रांचा समावेश होतो.

यासोबतच कोणती बंदूक अर्जदाराला घ्यायची आहे याची देखील नोंद या ठिकाणी करावी लागते. यासोबतच चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र ही कागदपत्रे देखील सादर करावी लागतात.

याशिवाय ज्या कारणांसाठी बंदुकीचा परवाना आवश्यक आहे ते कारण देखील द्यावे लागते. विशेष म्हणजे बंदुकीचा परवाना खरंच जरुरीचा आहे हे संबंधित अधिकाऱ्याला पटवून द्यावे लागते.

Ahmednagarlive24 Office