Categories: स्पेशल

साप विषारी आहे की बिनविषारी कसे ओळखणार ? तज्ञांनी दिली मोठी माहिती, वाचा….

Published by
Ahmednagarlive24 Office

Snake Viral News : साप समोर आला तर पायाखालची जमीन सरकते. सर्वजण सापाला घाबरतात. मात्र सर्वचं साप विषारी नसतात. तथापि कोणते साप विषारी आहेत आणि कोणते बिनविषारी हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे सापांपासून लांब राहिलेलेच बरे.

भारतात प्रामुख्याने सापाच्या चार विषारी जाती आढळतात. या जातींचे साप जर चावलेत तर मृत्यूचा देखील धोका असतो. त्यामुळे तज्ञ लोक सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब दवाखान्यात जाण्याचा सल्ला देतात. विषारी साप चावल्यास जेवढ्या लवकर दवाखान्यात गेले तेवढे फायदेशीर ठरते.

दरम्यान आज आपण साप विषारी आहे की बिनविषारी हे कसे ओळखले जाऊ शकते याविषयी तज्ञ लोकांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर भारतात आपण बाबत अनेक भ्रामक कथा आहेत. मात्र यापैकी अनेक कथा या चुकीच्या आहेत. यामुळे, या चुकीच्या कथा डोक्यात ठेवण्यापेक्षा सापांपासून दोन हात दूर राहिलेले केव्हाही चांगले.

साप विषारी आहेत हे कसे ओळखणार ?

तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे, साप विषारी आहे की नाही हे त्याच्या शरीरावरून सहजतेने ओळखता येऊ शकते. त्याच्या डोळ्यावरून तो विषारी आहे की बिनविषारी हे ओळखले जाऊ शकते. सामान्यता विषारी सापांची डोळ्याची बाहुली सामान्यतः चिरलेली किंवा अंडाकृती असते, तर बिनविषारी सापांची बाहुली सामान्यतः गोल असते.

मांजरीच्या डोळ्याप्रमाणे, बहुतेक विषारी सापांची बाहुली पातळ, काळी, उभी, पिवळ्या-हिरव्या नेत्रगोलकाने वेढलेली असते. तथापि, याला देखील काही अपवाद आहेत. जसे की, कोरल सापाची बाहुली गोलाकार असते. यामुळे साप दिसला की त्यापासून लांबच रहा. उगाच तो विषारी आहे की बिनविषारी हे ओळखण्याच्या नादात तो तुम्हाला चावू शकतो.

यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. याशिवाय, बिनविषारी सापांचे डोके गोलाकार असते, तर विषारी सापांचे डोके बहुतांशी त्रिकोणी असते. विषारी सापाच्या डोक्याचा आकार भक्षकांना घाबरवू शकतो. तथापि, काही बिनविषारी साप देखील बिनविषारी सापांच्या त्रिकोणी आकाराची नक्कल करून त्यांचे डोके सपाट करतात, जेणेकरून शिकारी पळून जातील.

मात्र यामुळे सर्वांनाच साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखता येईल असे नाही. यामुळे साप विषारी असो किंवा बिनविषारी त्यापासून नेहमीच लांब राहा. असं म्हणतात की, विषारी साप जेव्हा कोणी त्यांच्या जवळ जातं तेव्हा विषारी साप जोरात ओरडतात. ते घाबरवण्याचा प्रयत्न करतात. शेपूट वेगाने हलवू लागतात. बहुतेक विषारी सापांना पाण्याजवळ राहायला आवडते. पण भारतीय सापांमध्ये ही वागणूक वेगळी आहे. ते गरम ठिकाणी देखील राहतात.

विषारी साप रंगावरून देखील ओळखले जाऊ शकते. जसे की, भारतात आढळणारे बहुतेक विषारी साप पिवळे, तपकिरी आणि काळ्या रंगाचे असतात. मात्र असे असले तरी फक्त सर्पमित्रचं याची योग्य ओळख पटवू शकतात. यामुळे जेव्हाही साप दिसतील तेव्हा तुम्ही लांबच राहा.

Ahmednagarlive24 Office