विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! बारावीच्या रिझल्टची तारीख बदलली, आता कधी लागणार निकाल?

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या निकालाची चर्चा सुरू आहे. दरम्यान आता याच दोन्ही वर्गांच्या निकालाबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे.

Published on -

HSC SSC Result : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड एक्झाम चा रिजल्ट संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर केला जाणार असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जातोय. यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा देखील सध्या प्रसार माध्यमांमध्ये जोर पकडत आहेत.

खरंतर बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर केला जाईल आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये दहावीचा निकाल लागणार असे बोलले जात होते. बारावी बोर्डाचा निकाल 5-6 मे ला आणि दहावीचा निकाल त्यानंतर जाहीर होणार अशी शक्यता होती.

मात्र आता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल थोडासा लांबणार असल्याची बातमी हाती आली आहे. यामुळे आता आपण बारावी बोर्डाचा निकाल नेमका कधी लागणार याबाबतची अपडेट जाणून घेणार आहोत.

कधी लागणार बारावी बोर्डाचा निकाल?

मिळालेल्या माहितीनुसार बारावी बोर्डाचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्या ऐवजी दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

गोसावी यांनी सांगितल्याप्रमाणे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. सध्या या दोन्ही वर्गांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे.

खरेतर यावर्षी दहावी आणि बारावी बोर्डाचा पेपर लवकर झाला होता. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा दहा दिवस आधीच घेण्यात आल्या होत्या. यामुळे आता या दोन्ही वर्गांच्या परीक्षेचे निकाल सुद्धा वेळेच्या आधीच जाहीर केले जाणार आहेत.

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होत असतो. यंदा मात्र 15 मे च्या आधीच दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर होतील अशी शक्यता आहे.

निकाल कुठे पाहणार

बारावी आणि दहावी बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in, mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, msbshse.co.in, mh-ssc.ac.in, sscboardpune.in, sscresult.mkcl.org, hsc.mahresults.org.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील.

बारावीचे आणि दहावीचे निकाल जेव्हा जाहीर होतील तेव्हा या संकेतस्थळावर निकालाची लिंक उपलब्ध होईल आणि त्या लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांना निकाल बघता येईल. विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी त्यांचा बोर्ड परीक्षेचा सीट नंबर म्हणजेच आसान क्रमांक आणि आईचे नाव टाकायचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News