स्पेशल

त्या ठिकाणी मानवी सांगाडे सापडले, पण त्यामागचे गूढ कधीच सुटणार नाही !

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि इतर नाझी नेत्यांनी वेळ घालवला होता, त्या ठिकाणी मानवी सांगाडे सापडले, पण त्यामागचे गूढ कधीच सुटणार नाही, असे बोलले जात आहे.

सांगाडे वेगाने कुजल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित सांगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी या सांगाड्यांची तपासणी थांबवली आहे.

१९४१-४४ या काळात हिटलरचे मुख्य मुख्यालय ‘वुल्फ्स लेअर’ हे होते. सध्या हे ठिकाण पोलंडमध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हा भाग जर्मनीत मोडत होता. येथे २४ फेब्रुवारीला हे अवशेष सापडले होते. ‘वुल्फ्स लेअर’या ठिकाणी हर्मन गोअरिंगचे निवासस्थानही होते. त्यात चार मानवी सांगाडे पुरलेले सापडले होते. सर्वांचे हात-पाय बेपत्ता आहेत.

कंपाऊंडमधील खोल जंगलात सुमारे २०० नाझी बंकर आणि लष्करी बॅरेक असल्याचे दिसून आले आहे. २० जुलै १९४४ रोजी कर्नल क्लॉज स्टॉफेनबर्ग यांनी हिटलरवर केलेल्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नाचे हे ठिकाण होते. इ.स. १९४५ च्या सुरुवातीला जर्मनीच्या नाझी सैन्याने माघार घेताना वुल्फ्स लेअर नष्ट केले.

वेगाने जवळ येणाऱ्या सोव्हिएत युनियनच्या लाल सेनेच्या हातात हे गुप्त ठिकाण पडू नये म्हणून त्यांनी ही योजना आखली होती. सध्या हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे. स्थानिक पोलीस अभियोजक डॅनियल ब्रोडोव्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगाडे सापडल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

त्यांची न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. या चौघांची एकत्र हत्या झाली आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न तज्ज्ञ करत होते. मात्र त्यांना यश आले नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुरलेल्या सांगाड्यात तीन मध्यमवयीन पुरुष होते आणि चौथा मुलगा होता.

Ahmednagarlive24 Office