स्पेशल

ह्युंदाई देत आहे ग्राहकांना स्वतःची कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! कंपनीच्या ‘या’ चार कारवर मिळेल 80 हजार रुपयापर्यंत सूट; जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Hyundai Car Discount Offer:- नवरात्रीपासून जर आपण बघितले तर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स जारी करण्यात आलेले आहेत व या माध्यमातून ग्राहकांना अनेक मोठ्या प्रमाणावर सवलत देण्यात येत आहेत.

यामध्ये रोख स्वरूपात मिळणारी सवलत तसेच कॅश डिस्काउंट यासारख्या अनेक सवलतींचा अंतर्भाव आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक ऑफर राबविण्यात येत आहेत व त्यासोबतच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ऑफर्स ग्राहकांसाठी जारी करण्यात आलेले आहेत.

अगदी याच अनुषंगाने बघितले तर ह्युंदाई या कार उत्पादक कंपनीच्या माध्यमातून देखील आता ग्राहकांना कार घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून कंपनी नवीन हॅचबॅक आणि एसयूव्ही मॉडेलवर तब्बल 80 हजार रुपयापर्यंतची बंपर सवलतीचा लाभ देत आहे. त्यामुळे या लेखात आपण हुंदाई कोणत्या कारवर ही सवलत देत आहे याबद्दलची माहिती बघू.

 ह्युंदाईच्यायाचार कारवर मिळेल 80 हजार रुपयांपर्यंत सवलत

1- ह्युंदाई वेन्यू(Hyundai Venue)- ही कंपनीची सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार असून या कारवर सध्या ऑफर अंतर्गत 80,629 रुपयापर्यंत सवलत मिळत आहे.

इतकेच नाही तर 21 हजार 628 रुपये किमतीचे ॲक्सेसरीज पॅकेज तुम्हाला फक्त 5999 रुपयांना मिळणार आहे. सध्या या एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 94 हजार 100 ते 13 लाख 53 हजार रुपयापर्यंत आहे.

2- ह्युंदाई एक्स्टर(Hyundai Exter)- हुंदाई कंपनीची ही एक महत्वपूर्ण अशी कार असून या कारमध्ये सहा एअर बॅग देण्यात आलेले आहेत. सध्या या कारवर 42 हजार 972 रुपयांची सवलत मिळत आहे व 17 हजार 971 रुपयांचे ॲक्सेसरीज पॅकेज फक्त 4999 रुपयांना तुम्हाला मिळणार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख 99 हजार 900 रुपये ते दहा लाख 42 हजार आठशे रुपये पर्यंत आहे.

3- ह्युंदाई ग्रँड i10 Nios- कंपनीच्या या हॅचबॅक मॉडेलवर 58 हजार रुपये पर्यंतची सूट मिळत असून या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत पाच लाख 92 हजार 300 रुपये ते टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत आठ लाख 56 हजार 300 रुपये पर्यंत आहे.

4- ह्युंदाई i20- या कारवर कंपनीने तब्बल 55 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 4 हजार 400 रुपया पासून ते 11 लाख 20 हजार 900 रुपये पर्यंत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil