स्पेशल

बँकेकडून कर्ज घेतले व कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर पुढे काय? कुणावर असते हे कर्ज फेडण्याची जबाबदारी? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

बऱ्याचदा जीवनामध्ये विविध कामाकरिता आपल्याला कर्ज घ्यावे लागते व असे कर्ज घेताना बँक व इतर वित्तीय संस्थांचा पर्याय यामध्ये निवडला जातो. कर्ज घेण्याची गरज व्यक्तीवर विविध कारणांमुळे येऊ शकते. कधी ती लग्नकार्य त्यामुळे येऊ शकते किंवा वैद्यकीय खर्च अचानक उद्भवला तरी आपल्याला कर्ज घ्यावे लागते.

तसेच कार किंवा इतर वाहन घेण्यासाठी आपण कर्ज घेत असतो तसेच घर विकत घेण्याकरिता देखील होम लोन घेतो. अशा अनेक प्रकारे आपण कर्ज घेत असतो व या कर्जाची परतफेड प्रत्येक महिन्याला विशिष्ट रक्कम म्हणजेच ईएमआय भरून करत असतो.

परंतु काही प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तीने कर्ज घेतलेले आहे त्या व्यक्तीचाच काही कारणास्तव अचानक मृत्यू होतो व नंतर प्रश्न उभा राहतो की आता बँकेचे कर्ज कोण फेडेल किंवा बँकेचे थकबाकी कोण भरेल? याविषयीचा प्रश्न अनेक जणांच्या मनात आला असेल. याबाबतचे नेमके नियम काय आहेत हे आपण समजून घेऊ.

 कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज फेडण्याची जबाबदारी कोणाची असते?

1- होम लोनच्या संबंधित काय आहे नियम?- जेव्हा आपण घर घेण्यासाठी होम लोन घेतो तेव्हा त्या घराची कागदपत्रे बँकेकडे तारण म्हणून ठेवलेले असतात. परंतु एखाद्या वेळी दुर्दैवाने होम लोन घेतलेल्या व्यक्तीचाच मृत्यू झाला तर मात्र घेतलेले होमलोन फेडण्याची जबाबदारी ही कर्जदाराच्या वारसांवर किंवा को-बॉरोअवर असते.

जर कर्जदाराची वारसदार कर्ज परतफेड करू शकतील या योग्यतेचे किंवा त्या परिस्थितीत असतील तर ते परतफेडीची जबाबदार त्यांच्यावर असते. याशिवाय संबंधित मालमत्ता विकून कर्जाची परतफेड करण्याचा पर्याय अशा प्रकरणांमध्ये दिला जातो.

जर या प्रकारे कर्जाची परतफेड झाली नाही तर मात्र बँकेकडे गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव बँक करते आणि कर्जाची थकबाकी वसूल करते. आताची जर आपण नवीन पद्धत पाहिली तर बँका लोन देताना विमा काढतात व जर लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँका त्यांचा पैसा विम्याच्या माध्यमातून वसूल करतात.

2- वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन विषयी नियम पर्सनल लोन हा असुरक्षित कर्जाचा प्रकार आहे. तसेच या सोबत क्रेडिट कार्ड लोन देखील असुरक्षित कर्ज आहे. अशा प्रकारचे कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर बँकांना कुठल्याही प्रकारे संबंधित व्यक्तीकडून पैसे वसूल करता येत नाहीत. तसेच पर्सनल लोनच्या संबंधात कर्जदाराच्या वारसावर या कर्ज परतफेडीची कोणतीही जबाबदारी नसते त्यामुळे कर्जदाराच्या मृत्यूनंतर पर्सनल लोन ऑटोमॅटिक संपुष्टात येते.

3- कार लोनच्या संबंधित काय आहे नियम?- बऱ्याचदा बँकेकडून कर्ज घेऊन कार विकत घेतली जाते व अशा प्रकारे घेण्यात आलेले कार लोन हा एक सुरक्षित कर्जाचा प्रकार आहे व अशा प्रकारे कार लोन घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर बँक कुटुंबातल्या सदस्यांना संबंधित कर्जाची परतफेड करण्यासाठी सांगते व जर कुटुंबातील लोकांनी कर्जाची परतफेड केली नाही तर मात्र बँक कार विकून कर्जाची रक्कम वसूल करते.

Ajay Patil