स्पेशल

राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास महिला व शेतकऱ्यांसाठी ठरेल गेमचेंजर! मिळतील भरभरून लाभ आणि बरेच फायदे

Published by
Ajay Patil

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आले आहेत व यात अनेक जनहिताच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आलेला आहे.

महायुतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये ऐवजी प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील मिळणार आहे. सध्या वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या दाव्यानुसार बघितले तर राज्यात महायुतीची सत्ता परत येणार असल्याचे भाकीत वर्तवले गेल्यामुळे महिला व शेतकरी वर्गामध्ये एक समाधानाची भावना दिसून येत.

राज्यातील अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार 2100 रुपये
महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली जात असून यामध्ये तब्बल अडीच कोटी महिलांनी नोंदणी केली आहे.म्हणजेच अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे पाच हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे.

या योजनेचे लोकप्रियता महिला वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्यातील लाडकी बहिणींचा महायुती सरकारला या निवडणुकीत तरी पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. महिलाचा पाठिंबा असल्यामुळेच महायुती सरकार पुन्हा सत्तेवरयेईल अशी शक्यता वाढल्याचा अंदाज आहे.

या योजनेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये 46 हजार कोटींची तरतूद केली असून या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा जर महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास ही रक्कम पंधराशे वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

महायुती पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना होईल फायदा
महायुती सरकारचे जर आतापर्यंतचे शेतकरी हिताचे निर्णय बघितले तर यामध्ये आपल्याला कांदा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये देणारी भावांतर योजनेचा विशेष उल्लेख करावा लागेल. या योजनेच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गाईच्या दुधाला अनुदान देण्याचा निर्णय देखील एक गेमचेंजर निर्णय म्हटला तरी वावगे ठरणार नाही. शेतीला सिंचनाच्या मोठ्या प्रमाणावर सोयी उपलब्ध व्हाव्यात याकरिता नदीजोड प्रकल्पांना चालना देण्याचे काम देखील या सरकारने केले असून महाराष्ट्रातील नारपार आणि नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्पांना केंद्राची मान्यता घेण्यात आली असून त्यामुळे महाराष्ट्रातील मोठा भाग ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

तसेच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता व तो म्हणजे सात एचपी पर्यंत कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना शून्य वीज बिल देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

तसेच या घोषणेनंतर या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. तसेच येणाऱ्या काळात शेती पंपांना सौर ऊर्जेचा वापरातून मोफत वीज देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.या माध्यमातून राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत कृषी योजनेचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिले आहे आश्वासन
महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खूप ज्वलंत आणि गंभीर असा प्रश्न असून यामागील प्रमुख कारण म्हणजे वारंवार येणारी नापिकी आणि कर्जाचा बोजा हे आहेत व या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी हे एक महत्त्वाचे आश्वासन देण्यात आले आहे.

त्यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तसेच किमान आधारभूत किमतीवर 20 टक्के अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे व किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दरवर्षी मिळणारी 12 हजाराची रक्कम ही 15000 रुपये केली जाणार आहे.

राज्यातील महिला व शेतकऱ्यांना आहे महायुतीचे सरकार पुन्हा येण्याचा विश्वास
महायुती सरकारने त्यांच्या कालावधीत घोषित केलेल्या योजना व त्यांची पूर्तता निवडणुकीत जमेच्या बाजू ठरताना दिसून येत आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेची पूर्तता व शेतकऱ्यांची वीज बिल माफीचे आश्वासन पूर्ण करणे इत्यादी मुळे शेतकरी आणि महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून हा वर्ग या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल अशी शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे.

त्यामुळे या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा महायुती सत्तेच्या गादीवर विराजमान होईल व महिलांना 2100 रुपये दरमहा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा विश्वास शेतकरी व महिला वर्गाला वाटताना दिसून येत आहे.

Ajay Patil