स्पेशल

बाईकवरून दररोज लांबचा प्रवास करतात तर ‘या’ आहेत कमीत कमी किमतीत मिळणाऱ्या उत्तम बाईक! खरेदी कराल तर संपूर्ण पैसे होतील वसुल !

Published by
Ahmednagarlive24 Office

जेव्हा आपण कुठलीही गोष्ट बाजारामध्ये विकत घ्यायला जातो तेव्हा त्या वस्तूची गरज आणि तिची किंमत पाहून प्रामुख्याने आपण ती खरेदी करत असतो. हाच मुद्दा बाईक किंवा इतर वाहन खरेदीच्या बाबतीत देखील आपल्याला दिसून येते. समजा तुम्हाला जर बाईक खरेदी करायचे असेल तर सगळ्यात अगोदर कमीत कमी किंमत आणि त्या किमतीमध्ये चांगल्यात चांगली वैशिष्ट्य आपल्याला मिळतील अशा पद्धतीने बाईकचा शोध घेतला जातो व निवड केली जाते व तीच बाईक खरेदी केली जाते.

तसेच दुसरे म्हणजे आपल्याला बाईक नेमकी कशासाठी लागत आहे किंवा आपल्याला बाईकची गरज कोणत्या कामासाठी आहे? हा देखील मुद्दा बाईक खरेदीच्या मध्ये खूप महत्त्वाचा असतो. समजा तुमचा काही कामानिमित्त दररोज लांबचा प्रवास होत असेल तर तुम्हाला चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईक फायद्याच्या ठरतील व त्या दृष्टिकोनातून बाईक बाजारामध्ये अशा काही बाईक आहेत की त्या तुम्ही कमीत कमी किमतींमध्ये घेऊ शकतात व मायलेज देखील चांगल्या देतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या दररोजच्या लांबच्या प्रवासाच्या गरजेतून जर बाईक घ्यायची असेल तर या लेखामध्ये आपण काही बाईकची माहिती थोडक्यात घेणार आहोत.

या आहेत कमीत कमी किमतीत मिळणाऱ्या उत्तम अशा बाईक

1) होंडा शाइन 100

ही बाईक खूप लोकप्रिय असून तिच्या सिंगल डिझाईन मुळे ती जास्त लोकप्रिय ठरताना आपल्याला दिसून येते. रोजच्या लांबच्या वापराकरिता ही एक उत्तम बाईक असून यामध्ये 98.98 सीसी क्षमतेचे इंजिन असून ते 5.43kW ची पावर आणि 8.05m टॉर्क जनरेट करते. या बाइकला चार स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून ही बाईक एका लिटरमध्ये 65 किलोमीटरचे मायलेज देण्यास सक्षम आहे असा कंपनीचा दावा आहे. या बाईक मध्ये कंपनीने फ्रंट रियरला ड्रम ब्रेक्स दिलेले आहेत. खडबडीत आणि खराब रस्त्यांवरून चालवण्यासाठी ही बाइक उत्तम असून तिची कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम चांगलं ब्रेकिंग मिळण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.

2) टीव्हीएस एक्सएल 100

भारतामध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या बाईकच्या यादीत, पहिल्या दहामध्ये या बाईकचा समावेश करण्यात आलेला असून ही एक कम मोपेड बाईक आहे. या बाईकमध्ये 99.7 सीसी फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजीचा फोर स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलेले असून ते 4.3 बीएचपी पावर आणि 6.5 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक ८० किलोमीटरचे मायलेज देते. लहान स्वरूपाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि जड सामानाचे वाहतूक करावी लागत असेल तर ही बाईक चांगला पर्याय आहे. या बाईकचा टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

3) हिरो मोटोकॉर्पची एचएफ 100

ही एक महत्त्वाची आणि प्रसिद्ध बाईक असून या बाईकमध्ये 100cc इंजिन देण्यात आले आहे.ही बाईक 8.02 पीएसची पावर देते व हिला चार स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही बाईक एका लिटरमध्ये 70 किलोमीटरचे मायलेज देते व हिचा सस्पेन्शन देखील मजबूत आहे. सस्पेन्शन मजबूत असल्यामुळे ही खराब रस्त्यांवरून देखील सहजपणे धावते.

4)टीव्हीएस स्पोर्ट

दमदार मायलेजच्या यादीमध्ये टीव्हीएस स्पोर्ट या बाईकचे नाव सर्वप्रथम आहे. 110cc इंजिन असलेली बाईक असून इंजिन 8.29 पीएस पावर आणि 8.7 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये फोर स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेले आहे तसेच यामध्ये ET-Fi तंत्रज्ञान वापरण्यात आल्यामुळे इंधन कमी लागते. मायलेजच्या बाबतीत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनुसार टीव्हीएस स्पोर्ट या बाईकने मायलेजचा एक विक्रम प्रस्थापित केला असून या बाईकने तब्बल 110.12 किलोमीटरचे मायलेज मिळवला आहे. या बाईकच्या पुढच्या चाकाला १३० मीमी ड्रम ब्रेक तर रियर व्हीलला 110 एमएम ड्रम ब्रेकची सुविधा देण्यात आलेली आहे.

Ahmednagarlive24 Office