शेअर मार्केटचे ‘हे’ नियम पाळले तर तुम्ही कमवू शकतात अफाट पैसा; वाचा आणि मिळवा फायदा

Pragati
Published:
share market

सध्या शेअर मार्केटमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत असून अनेक व्यक्ती आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू लागलेले आहेत. परंतु यामध्ये बरेच गुंतवणूकदार मार्केटविषयी पुरेशी माहिती न घेता किंवा एखाद्या तथाकथित शेअर मार्केट एक्स्पर्टच्या नादाला लागून नको त्या ठिकाणी पैसे गुंतवतात आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी मार्केट विषयीचे संपूर्ण माहिती व अभ्यास असणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच आपल्या विश्वासाचे आणि प्रसिद्ध असलेल्या तज्ञांची मदत घेणेदेखील यामध्ये खूप गरजेचे आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये काही नियम पाळणे देखील गरजेचे असते व त्यानुसार जर शेअर मार्केट गुंतवणुकीची प्लॅनिंग केली तर नुकसानी ऐवजी फायदा होण्याची शक्यता जास्त असते.

शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी हे नियम पाळा

1 – सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तोच व्यक्ती यशस्वी बनू शकतो जो दीर्घ कालावधी डोळ्यासमोर ठेवून सगळी प्लॅनिंग करतो. यामध्ये शॉर्ट टर्म म्हणजेच कमी कालावधीचा विचार करणाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवून यामध्ये उतरावे.

2 – सगळ्यात महत्वाची म्हणजे स्टॉक्स खरेदी करताना आपल्याला कॉलिटी स्टॉक्स ओळखता आले पाहिजे तो स्टॉक पीक करता आली पाहिजे. याउलट जे अयशस्वी गुंतवणूकदार असतात ते जास्तकरून कॉलिटी नाही तर कॉन्टिटीवर लक्ष केंद्रित करतात. पेनी स्टॉक हे स्वस्त मिळतात व त्यामुळे अनेक अयशस्वी गुंतवणूकदार खूप जास्त प्रमाणामध्ये असे स्टॉक खरेदी करतात आणि कॉलिटी स्टॉक महाग असतात म्हणून ते खरेदी करत नाहीत. परंतु क्वांटिटीपेक्षा क्वालिटी स्टॉकवर लक्ष केंद्रित करावे.

3 – एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत किती आहे हे न बघता त्या कंपनीचा व्यवसाय कसा आहे? त्यासोबतच फायनान्शिअल स्टेटमेंट कॅश फ्लो, कंपनीची बॅलन्स शीट व त्याचे रिझल्ट मॅनेजमेंटची कॉमेंट्री या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणूक करावी.

4 – तसेच मार्केटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही अपडेट राहणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. शेअर मार्केटचा ऑफ टाईम असेल तरी देखील तुम्ही कायम ऑन टाइम मार्केट विषयी शिकणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला जितका वेळ मिळेल तितक्या वेळात तुम्ही स्वतःला अपडेट करून शिकत राहणे गरजेचे आहे.

5 – सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे असलेले सगळे पैसे एका स्टॉक मध्ये न लावता तो पैसा वेगवेगळ्या ठिकाणी लावणे किंवा वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही एकाच सेक्टरमध्ये भरपूर स्टॉक खरेदी करण्यापेक्षा भरपूर सेक्टर मधले टॉपचे स्टॉक्स निवडणे हे महत्त्वाचे असते.

6 – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपण सोन्यात किंवा जमिनीत गुंतवणूक केली तर आपण परत परत त्याचे रेट तपासात नाहीत व त्याची चौकशी करत बसत नाहीत. अगदी त्याचप्रकारे तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. म्हणजे संयम ठेवणे गरजेचे आहे.

7 – सगळ्यात महत्वाचे म्हणजे समजा तुम्ही एखादा कंपनीचा शेअर्स घेतला व त्या माध्यमातून तुम्हाला चांगला नफा मिळाला तर आलेला पैसा तुम्हीच्या मौजेसाठी खर्च न करता तोच पैसा पुन्हा री इन्वेस्ट करणे गरजेचे असते. चांगल्या स्टॉकमध्ये इन्वेस्ट केली तर अधिकचा फायदा आपल्याला मिळतो.

8 – यात महत्त्वाचे म्हणजे सध्या स्टॉक मार्केटमध्ये टिप्स देणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपण पाहतो. परंतु अशा व्यक्तींवर किंवा अशा गोष्टींवर लक्ष न देता आपला स्वतःचा अभ्यास आणि स्वतःची विश्लेषण आणि आपले शिक्षण यावर विश्वास ठेवून काम करणे गरजेचे असते. मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांची विचारसरणी आत्मसात केली पाहिजे. पण कोणी आपल्याला काही सांगत आहे व त्याचा ऐकून आपण कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करत आहोत हे मात्र टाळले पाहिजे. आपल्या स्वतःच्या स्टडी अनालिसिसच्या आधारावर आपण निर्णय घेणे गरजेचे असते.

9 – तसेच कर्ज घेऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे खूप जोखमीची बाब असून ते कधीच करू नये. आपला जो काही इन्कम आहे त्यामध्ये बचत करून ते पैसे गुंतवणे गरजेचे असते. शेअर मार्केट हे जोखमीने भरलेले असल्याने कर्ज घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करणे हा संपूर्णपणे मूर्खपणा ठरू शकतो.

10 – तसेच तुमचा स्टॉकचा जो काही पोर्टफोलिओ असतो त्याचा रिव्ह्यू किंवा अभ्यास करत राहणे खूप गरजेचे आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठला स्टॉक ऍड करायचा आणि कुठला कमी करायचा किंवा थोडासा प्रॉफिट कोणत्या ठिकाणी बुक करायचा आहे यासारख्या गोष्टींवर तुमची नजर असणे गरजेचे आहे. नाहीतर पैसे गुंतवले आणि त्याकडे लक्ष दिले नाही असं देखील करू नये.

11 – खराब स्टॉक्स मधून बाहेर निघणे हे कधीही चांगले लक्षण असते. कारण खराब स्टॉक मध्ये ऍव्हरेज करण्यामध्ये काही अर्थ नसतो व त्यापेक्षा तो लॉस बुक करणे कधीही चांगले ठरते.तसेच असे स्टॉक जास्त दिवसाकरिता होल्ड करणे सुद्धा चुकीचे असते. त्या व्यतिरिक्त चांगल्या स्टॉकमध्ये एव्हरेज करणे हे उत्तम ठरते व वाईट स्टॉकमध्ये एव्हरेज न करता त्यातून बाहेर निघणे महत्त्वाचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe