स्पेशल

कोल्हापूर एकच मात्र पर्यटन स्थळ अनेक! कुटुंब किंवा मित्रांसोबत करा कोल्हापूर जिल्ह्याची सैर, निसर्गाचे सौंदर्य देईल मानसिक शांतता

Published by
Ajay Patil

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे असे पर्यटन स्थळे असून जवळपास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये काही नैसर्गिक पर्यटन स्थळे असून त्यासोबतच काही आध्यात्मिक पर्यटन स्थळे तर काही ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश होतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते.

त्यातल्या त्यात पावसाळ्याच्या कालावधीत तर महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात. याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा पहिला तर हा जिल्हा निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने समृद्ध आहेच.

परंतु या जिल्ह्याला ऐतिहासिक समृद्ध असा वारसा देखील आहे. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये तुमचा देखील कुठे फिरायला जायचा प्लॅन असेल तर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याची सैर करून बरीच पर्यटन स्थळे पाहू शकतात.

 या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे

1- पन्हाळगड तुम्हाला जर पावसाळी पर्यटन करायची असेल व निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हे ठिकाण ऐतिहासिक दृष्टीने समृद्ध आहे. परंतु मुळात थंड हवेचे ठिकाण देखील आहे.

त्यामुळे तुम्हाला जर निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाला भेट देणे खूप गरजेचे आहे. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य नक्कीच तुमच्या मनाला भुरळ घालण्याशिवाय राहणार नाही.

2- मसाई पठार कोल्हापूर शहराच्या पश्चिम दिशेला तीस किलोमीटर अंतरावर मसाई पठार असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पडणारा रिमझिम पाऊस आणि दाट धुके मनाला मोहून टाकते.

मसाई पठार हे दहा पठारांचे मिळून बनलेले एक विस्तीर्ण पठार असून या ठिकाणी पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रजातींचे फुले उगवतात व त्यासाठी हे पठार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही देखील पावसाळ्यामध्ये मसाई पठाराला आवर्जून भेट देणे गरजेचे आहे.

3- गगनगड गगनगड हे नाथपंथी गैबीनाथांचे मूळ स्थान असून या ठिकाणी गगनगिरी महाराजांची वास्तव्य देखील होते. गगनगडावर गेल्यावर तुम्हाला खोल दऱ्या तसेच दगडांमधील प्रशस्त नैसर्गिक गुहा,

सुंदर अशा कातळामध्ये कोरलेली भव्य हनुमानाची प्रतिमा तसेच बाजूलाच राम, लक्ष्मण आणि सीतामय्या यांची प्रतिमा मनाला मोहून टाकते.त्यामुळे गगनगड हे ठिकाण देखील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

4- गगनबावडा महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून गगनबावड्याला ओळखले जाते. कोल्हापूर ते विजयदुर्ग मार्गावर गगनबावडा तालुक्यात हा 13 किलोमीटर अंतराचा करूळ घाट आहे व 1968 सालापासून गगनबावड्यात या ठिकाणाहून वाहतूक चालते. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये करूळ घाटातून प्रवास केला तर तुम्हाला निसर्ग काय असतो हे जवळून अनुभवता येते.

5- निसर्गाने समृद्ध राधानगरी तालुका राधानगरी तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका असून या ठिकाणी पश्चिम घाटातील डोंगर दऱ्या, या ठिकाणचे सुंदर धबधबे मनाला भुरळ घालतात.

या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या धबधब्यांपैकी राऊतवाडी हा प्रसिद्ध धबधबा असून कोल्हापूर शहरापासून जवळपास 55 किलोमीटर अंतरावर आहे. राधानगरी मधून फक्त साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणचे दीडशे फुट उंचावरून पडणारे पाणी तुम्हाला निसर्गाचा आनंद देते.

6- विशाळगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड किल्ला असून सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्व जर पाहिले तर कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा अनुस्करा आणि आंबा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिलाहार काळामध्ये हा किल्ला बांधला गेला होता.

नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव विशाळगड असे ठेवले. बस किंवा खाजगी वाहनाने जाऊन या ठिकाणी तुम्ही एकदा भेट द्यावी व निसर्गाच्या सौंदर्य जवळून पहावे.

Ajay Patil