Health Tips:- आजकालची धकाधकीची जीवनशैली आणि आहार विहारात झालेला बदल यामुळे वाढत्या वजनाची समस्या व त्यासोबतच डायबिटीस म्हणजेच मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यातील जर आपण डायबिटीज चा विचार केला तर ही एक सध्याच्या कालावधीत सामान्य आरोग्य समस्या बनली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
डायबिटीस सध्या म्हाताऱ्या माणसांपासून तर अगदी लहान मुलांना देखील होऊ लागला आहे. या आजारामध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे वाढायला लागते व ती कधीकधी प्राणघातक देखील ठरते. त्यामुळे रक्तातील ही अनियंत्रित झालेली साखरेवर वेळेस नियंत्रण मिळवले नाही तर शरीरातील अनेक प्रमुख अवयवांचे नुकसान होते.
हा एक असाध्य आजार आहे व त्यावर कुठल्याही प्रकारचा कायमस्वरूपी उपचार नाही. या आजारावर नियंत्रण मिळवण्याचा राजमार्ग म्हणजे औषधे तसेच संतुलित आहार आणि जीवनशैलीतील बदल या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण या लेखात रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गव्हाचे पीठ मळताना त्यामध्ये कोणती गोष्ट मिसळावी त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचा फायदा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी होईल.
गव्हाच्या पिठात बेसन मिसळा
तुम्ही डायबिटीसची पेशंट असाल तर गव्हाच्या पिठाची रोटी बनवताना त्यामध्ये बेसन घालणे गरजेचे आहे. हे ग्लुटेन मुक्त आणि खाण्यास स्वादिष्ट असते. जर अशा पद्धतीच्या पिठापासून बनवलेली रोटी जर तुम्ही आहारात घेतली तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास खूप मोठी मदत होते व आरोग्याला अनेक फायदे देखील मिळतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेसन हे खूप फायदेशीर असून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप चांगला असतो व त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत मिळते. तसेच बेसन मध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते व यामुळे रक्तातील साखर तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते
व यामुळे शरीरातील इन्सुलिन स्पाईक रोखण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर गहू आणि बेसनाचे मिश्रण आणि बनवलेल्या रोट्या खाल्ल्यामुळे पोट जास्त कालावधी करिता आपल्याला भरलेलेच वाटते किंवा ते भरलेले राहते व या गोष्टीचा फायदा हा वजन कमी करण्यामध्ये होतो.
अशा पद्धतीने बनवा गव्हाच्या पिठात बेसन टाकून रोटी
गव्हाच्या पिठामध्ये एक चतुर्थांश बेसन मिसळावे व चांगले मळून घ्यावे. त्यानंतर हे पीठ झाकून ठेवावे आणि तीस मिनिटे त्याला सोडावे व नंतर त्या पिठापासून रोट्या बनवा आणि बेक करा. या पद्धतीने तयार केलेली चपाती किंवा रोटी नेहमी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
(टीप– वरील माहिती ही वाचकांसाठी केवळ माहितीस्तव सादर केलेली आहे. हा कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही. आहारात कुठलाही बदल करण्या अगोदर वैद्यकीय तज्ञांशी संपर्क करावा.)