Loan EMI Tricks:- बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जाच्या प्रक्रिया अगदी सहज आणि सोपे झाले असल्यामुळे आता कुठल्याही किचकट प्रक्रिये शिवाय तुम्हाला सहजासहजी कर्ज उपलब्ध करून दिली जातात.त्यामुळे आता कारलोन, होमलोन तसेच पर्सनल लोन घेण्याकडे बऱ्याच जणांचा कल आपल्याला दिसून येतो.
परंतु कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले तर त्याची परतफेड करावी लागते व या कर्जाची परतफेड आपल्याला मासिक ईएमआयच्या स्वरूपामध्ये करणे गरजेचे असते. कर्ज घेतल्यानंतर आपण बऱ्याच कालावधीपर्यंत नियमितपणे कर्जाची हप्ते भरणे सुरू देखील करतो. पण तो मध्यंतरीच्या कालावधीत जर काही आर्थिक अनियमितता किंवा काही आर्थिक परिस्थिती उद्भवली तर मात्र आपल्याला हप्ते भरणे कठीण जायला लागते किंवा आपण असमर्थ ठरतो.
अशावेळी मात्र आपल्याला संबंधित बँकांकडून ईएमआय भरण्यासाठी फोन यायला लागतात व आपली चिंता आणखीन वाढते. परंतु अशावेळी चिंता न करता काही पर्यायांचा वापर करून तुम्ही यातून योग्य तो दिलासादायक मार्ग काढू शकतात.
कर्जाचे हप्ते भरण्यात अडचणी आल्या किंवा हप्ते बाउन्स झाले तर काय करावे?
1- अगोदर तुमच्या बँकेशी संपर्क साधा– समजा काही आर्थिक परिस्थिती किंवा काही कारणामुळे तुमचा खर्चाचा पहिला हप्ता बाउन्स झाला तर तुम्ही सगळ्यात आगोदर तुम्हाला कर्ज ज्या बँकेने दिलेले आहे त्या बँकेशी संपर्क साधून त्या ठिकाणी मॅनेजरशी बोलणे गरजेचे आहे.
मॅनेजर तुम्हाला पुढील हप्ता काळजीपूर्वक भरण्याचा सल्ला देतात. परंतु तुमचा हप्ता थकीत होण्याचे कारण जर काही मोठे असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता काही महिन्यांकरिता होल्डवर ठेवण्यासाठी अर्ज देखील करता येऊ शकतो
व केलेल्या अर्जामुळे तुम्हाला काही महिन्यांकरिता हप्ता भरण्यापासून दिलासा मिळतो व नंतर जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा ती रक्कम तुम्ही परत करू शकतात. परंतु यावर बँक मॅनेजर कितपत सकारात्मक निर्णय घेतो यावर ते सगळं अवलंबून असतं.
2- कर्जाच्या अटींची पुनर्रचना– जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा त्या कर्जासंबंधीच्या बऱ्याच काही अटी असतात. अशाप्रसंगी जेव्हा तुमचा एखादा हप्ता किंवा हप्ता भरण्यामध्ये तुम्हाला समस्या निर्माण झाल्यास बँक कधीकधी कर्जाच्या अटींची पुनर्रचना देखील करू शकते किंवा काही काळासाठी स्थगिती देऊ शकते. असे जर बँकेने केले तर तुम्हाला काही कालावधी करिता ईएमआय भरण्यापासून मुक्तता मिळू शकते.
3- कर्जाचा कालावधी वाढवा– तुम्हाला कर्जाचे हप्ते भरण्यामध्ये अडचणी यायला लागल्या तर तुम्ही बँकेच्या मॅनेजरशी बोलून तुमच्या कर्जाचा कालावधी वाढवण्यासाठीची रिक्वेस्ट करू शकतात. मॅनेजरने जर तुमच्या कर्जाच्या कालावधी वाढवला तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला जी काही हप्त्यापोटी रक्कम भरावी लागते ती कमी होऊ शकते व तुमच्यावरचा आर्थिक भार कमी होतो.
4- टॉप अप लोन किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधाचा फायदा घेणे– जर हप्ते भरण्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी यायला लागल्या व तुम्ही हप्ता भरण्यात असमर्थ ठरला तर तुम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधा किंवा टॉप-अप लोन करीता देखील अर्ज करू शकतात.
या पद्धतीमध्ये ओव्हरड्राफ्ट ही एक क्रेडिट सुविधा असून बँक तुम्हाला तुमचे जे काही चालू किंवा बचत खाते आहे त्या माध्यमातून ती देते. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जी काही शिल्लक आहे
त्यापेक्षा जास्त पैसे काढण्याची परवानगी तुम्हाला बँक देते. त्याशिवाय टॉप-अप लोन मध्ये सध्याचे जे काही कर्ज आहे त्यापेक्षा अतिरिक्त रक्कम घेतली जाते. तुमच्याकडे जर अगोदरच कर्ज असेल तर तुम्हाला हे कर्ज मिळू शकते.
5- लोन कन्सोलिडेशन करणे– बऱ्याचदा अनेकजण अनेक छोटे मोठे कर्ज घेऊन ठेवतात व अशावेळी हप्ते भरण्यामध्ये अनेक अडचणी येतात. अशाप्रसंगी तुम्ही छोट्या मोठ्या कर्जांचे एकत्रीकरण करू शकतात म्हणजेच त्याला लोन कन्सोलिडेशन म्हणतात. यामध्ये तुम्ही सर्व कर्ज एकाच कर्जामध्ये विलीन करून त्याचा एकच ईएमआय ठरवून तो भरू शकता.
याचा फायदा असा होतो की तुम्हाला अनेक कर्जाऐवजी फक्त एकच कर्जाचा हप्ता भरावा लागतो व त्यामुळे तुम्हाला महिन्याचे तुमचे आर्थिक बजेट ट्रॅक करणे सोपे होते. तसेच दुसरा फायदा म्हणजे अशा प्रकारचे लोन एकत्रित केल्यामुळे लहान कर्जांपेक्षा तुम्हाला कमी व्याजदर भरावा लागतो व तुमची व्याज पेमेंट कमी होते.