Tax Saving Tips:- भारतामध्ये आयकर दात्यांची संख्या मोठी असून यामध्ये पगारदार व्यक्तींचा खूप मोठा समावेश आहे. त्याकरिता बरेच पगारदार लोक हे कर वाचवण्यासाठी कर भरण्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये अनेक प्रकारचे प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. परंतु वेळेला कुठलीही योजना अमलात आणण्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते.
कर वाचवण्याकरिता तुम्ही जर बचतीची एखादी आगाऊ स्वरूपामध्ये योजना बनवली तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये रक्कम वाचवू शकतात. आपल्याला माहित असेलच की आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ उपलब्ध होतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण असे काही पर्याय बघणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे टॅक्स वाचवू शकतात.
या मार्गांचा वापर करून तुम्ही वाचवू शकतात टॅक्स
1- फिक्स डिपॉझिटमधील गुंतवणूक– समजा तुम्ही पाच वर्षाच्या मुदतीसह एफडी मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला यामध्ये एक लाख 50 हजार रुपये पर्यंत करात सवलत मिळू शकते. सध्या जर आपण मुदत ठेव म्हणजेच एफडीवर मिळणारा व्याजदर पहिला तर तो सात ते आठ टक्क्यांपर्यंत आहे. परंतु एफडीवर जे काही व्याज मिळते ते करपात्र आहे. परंतु यावर आयकर कायद्याच्या 80c अंतर्गत एफडी वर कर कपात उपलब्ध आहे.
2- पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेमधील गुंतवणूक– सरकारच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजनेवर देखील कर बचतीचा लाभ घेता येतो. या योजनेचा लॉक इन कालावधी पंधरा वर्षाचा असतो व त्यावर प्रत्येक तिमाहित व्याजाचे दर बदलतात. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीतून जो काही व्याजाचा लाभ मिळतो ते व्याज देखील करमुक्त आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून कर वाचवू शकतात.
3- इक्विटी लिंक्ड बचत योजना अर्थात ईएलएसएस– इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम हा देखील गुंतवणुकीसाठी एक उत्तम असा पर्याय आहे व याचा देखील लॉक इन पिरेड तीन वर्षाचा आहे. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स लागू आहे. परंतु एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांची पूर्तता करमुक्त आहे. जर ते एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर दहा टक्के दराने कर आकारला जातो.
4- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी– या योजनेमध्ये पाच वर्षापर्यंत निश्चित व्याजाचा लाभ उपलब्ध आहे. या योजनेतून गुंतवणूक केल्यावर त्यावर वार्षिक 6.8 टक्के व्याज मिळते. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जोखीम न पत्करता गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्ही एका आर्थिक वर्षासाठी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीचा दावा करू शकतात.
5-
जीवन विमा पॉलिसी– आजकाल विम्याला खूप महत्त्व असून मोठ्या प्रमाणावर बरेच जण विमा घेतात. या आयुर्विमा पॉलिसीवर तुम्ही वार्षिक दीड लाख रुपये पर्यंत कर या माध्यमातून वाचवू शकतात.6- राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम– ही एक महत्त्वाचे अशी योजना असून यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या निवृत्तीसाठी लागणारा पैसा या माध्यमातून जमा करू शकतात. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्ही वार्षिक 2 लाख रुपये पर्यंत कर वाचवू शकतात. यामध्ये तुम्ही 80CCD(1B) अंतर्गत 50 हजार रुपयांचा अतिरिक्त कर वाचवू शकतो.
7- शिक्षण शुल्क– तुम्ही जर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ट्युशन फी भरलेल्या असतील तर त्या फीवर देखील तुम्ही कर बचतीचे फायदे मिळवू शकतात. या माध्यमातून तुम्ही 80c अंतर्गत कर बचतीचा लाभ घेऊ शकता.
8- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी– तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफ च्या माध्यमातून देखील कर बचतीचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्ही आयकर नियम 80c अंतर्गत एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयापर्यंत सूट मिळवू शकतात.
9- सुकन्या समृद्धी योजना– मुलींच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतोच परंतु कर बचतीचा देखील लाभ मिळतो. तसं पाहायला गेले तर ही योजनाच करमुक्त आहे.