SBI Home Loan:- एखाद्या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागात जरी घर घ्यायचे म्हटले म्हणजे त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर रकमेची गरज आपल्याला भासत असते.याकरिता लागणारी संपूर्ण रक्कम आपल्याकडे असेलच असे होत नाही. त्यामुळे आता बरेच व्यक्ती होम लोनचा पर्याय स्वीकारतात आणि त्या माध्यमातून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करत असतात.
सध्या परिस्थितीत जर आपण बघितले तर प्रत्येक बँकेच्या माध्यमातून होमलोनची सुविधा अगदी सोपी आणि सुटसुटीत करण्यात आल्यामुळे ताबडतोब होम लोन मिळत असल्याने आता जास्त प्रमाणात होमलोन घेऊन घर घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.परंतु होमलोन घेताना आपण बँकांच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या व्याजदराविषयीची माहिती घेणे खूप गरजेचे असते.
कारण या सगळ्या व्याजदराचा परिणाम हा आपल्या दर महिन्याच्या कर्ज परतफेडीच्या ईएमआय वर होत असल्याने व्याजदर समजून घेणे व त्याचे गणित मासिक हप्त्याच्या रूपात कसे असेल हे तुम्हाला कळले पाहिजे.
कारण होमलोन हे दीर्घ कालावधीसाठी घेतले जाणारे कर्ज असून तुम्हाला ते 15 ते 20 वर्ष कालावधीपर्यंत फेडावे लागते व त्यामुळे तुमच्या आर्थिक घडीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये त्या दृष्टिकोनातून व्याजदराचा विचार करूनच होमलोन घेणे फायद्याचे ठरते.
या दृष्टिकोनातून तुम्हाला 15 लाख रुपयांचे होमलोन दहा किंवा पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी घ्यायचे असेल तर तुम्हाला मासिक ईएमआय किती असेल? हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
सध्या जर आपण बँकांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या होम लोनचे व्याजदर बघितले तर ते सात ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान आहेत. परंतु यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोर तसेच तुमचा लोनचा कालावधी व किती रक्कम तुम्ही घेणार याच्यावर देखील व्याजदर अवलंबून असतो.
भारतातील प्रमुख बँकांचे होमलोनचे व्याजदर
1- स्टेट बँक ऑफ इंडियाचा सध्याचा होमलोनचा व्याजदर हा साधारणपणे 8.50% ते 9.15 टक्क्यांच्या दरम्यान आहे.
2- एचडीएफसी बँकेचा होमलोनचा व्याजदर हा साधारणपणे 8.65% ते 9.25% पर्यंत आहे.
3- ॲक्सिस बँकेचा होमलोनचा सध्याचा व्याजदर साधारणपणे 8.75% ते 9.35% इतका आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जर तुम्ही 10 वर्षाच्या कालावधी करिता 15 लाख होमलोन घेतले तर…
समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून दहा वर्षांकरिता पंधरा लाख रुपयांचे जर होमलोन घेतले तर सध्या एसबीआयचा सरासरी व्याजदर 8.75 टक्के आहे. त्यानुसार तुम्हाला दहा वर्षाच्या कालावधी करिता घेतलेल्या 15 लाख रुपये होम लोनसाठी मासिक ईएमआय 18856 भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला संपूर्ण कालावधीसाठी सात लाख 62 हजार 720 रुपये व्याज द्यावे लागेल व कर्जाची रक्कम आणि व्याज मिळून एकूण पेमेंट 22 लाख 62 हजार 720 रुपये करावे लागेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 15 वर्षाच्या कालावधी करिता 15 लाख रुपये होमलोन घेतले तर
समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पंधरा वर्षाच्या कालावधी करिता 15 लाख रुपयांचे होमलोन घेतले व त्यावर बँकेच्या माध्यमातून सरासरी 8.75 टक्के व्याजदर आकारला गेला तर तुमचा मासिक ईएमआय पंधरा हजार शंभर रुपये इतका असेल व तुम्हाला पूर्ण कालावधीमध्ये एकूण 12 लाख 32 हजार 580 रुपये व्याज द्यावे लागेल व कर्जाची रक्कम व व्याज मिळून तुम्हाला पंधरा वर्षात एकूण 27 लाख बत्तीस हजार पाचशे रुपये एकूण पेमेंट करावे लागेल.
होमलोनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र
होम लोनकरिता आधार कार्ड तसेच पॅन कार्ड, विज बिल, उत्पन्नाचा दाखला, तीन महिन्याची सॅलरी स्लिप, दोन वर्षाचा आयटी रिटर्न,बँक स्टेटमेंट, मालमत्तेची कागदपत्रे तसेच प्रिझर्वेशन सर्टिफिकेट, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.