LIC Jeevan Azad : गुंतवणुकीचे जे काही सध्या पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजना व त्या खालोखाल एलआयसीच्या अनेक योजनांमधील गुंतवणुकीला जास्त प्राधान्य दिले जाते. यामागील प्रमुख कारण म्हणजे गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा किंवा आर्थिक लाभ यांच्या दृष्टिकोनातून हे तीनही पर्याय खूप महत्त्वाचे ठरतात.
यामध्ये जर आपण एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळच्या दृष्टिकोनातून बघितले तर एलआयसीने आतापर्यंत अनेक योजना लॉन्च केलेले आहेत व या योजनांना तितकासा प्रतिसाद देखील गुंतवणूकदारांकडून मिळाला आहे.
यामधीलच या योजनेला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता देखील मिळाली असून ग्राहकांना संरक्षण आणि बचतीचा लाभ देण्यामध्ये एलआयसीची जीवन आझाद योजना महत्त्वाची आहे.
काय आहे एलआयसीच्या जीवन आझाद योजनेची वैशिष्ट्ये?
एलआयसीची ही योजना एक नॉन पार्टिसिपेटिंग म्हणजेच विना सहभागी, वैयक्तिक बचत इंडोमेंट योजना असून गुंतवणूकदाराला मिळालेल्या मॅच्युरिटी आणि डेथ क्लेम यामध्ये आधीच ठरलेला असतो. या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही जो काही प्रीमियम भरता तो उणे आठ वर्षाच्या कालावधी करिता भरावा लागतो.
म्हणजे तुम्ही जितक्या वर्षाकरिता पॉलिसी घेतली आहे त्यापेक्षा आठ वर्ष कमी कालावधीसाठी तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही ही योजना पंधरा वर्षांसाठी घेतली तर तुम्हाला पूर्ण पंधरा वर्षे पैसे न भरता फक्त सात वर्षे पैसे भरावे लागतात.
वीस वर्षांसाठी पॉलिसी खरेदी केली असेल तर तुम्हाला बारा वर्षांसाठी त्यामध्ये प्रीमियम भरावा लागतो. विशेष म्हणजे तुम्ही हा प्रीमियम महिन्याला किंवा तीन महिन्याच्या कालावधीत किंवा सहामाही आणि वार्षिक अशा पर्यायांमध्ये भरू शकतात.
कोणाला मिळतो या पॉलिसीचा फायदा?
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम देण्याची हमी मिळते तसेच किमान विमा रक्कम दोन लाख रुपये आणि कमाल पाच लाख रुपये आहे. तुम्ही एलआयसीचा हा प्लान पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीसाठी घेऊ शकतात. परंतु कालावधीनुसार यासाठीची वयोमर्यादा मध्ये मात्र बदल होतो.
अठरा,एकोणावीस आणि वीस वर्षाच्या योजना या तीन महिन्यांच्या मुलांसाठी देखील खरेदी केली जाऊ शकतात तर कमाल वयोमर्यादा यासाठीची पन्नास वर्षे आहे.
जर ही योजना सतरा वर्षांसाठी घेतली तर त्यासाठी एक वर्ष ते पन्नास वर्षे वयोगटातील लोक घेऊ शकतात. सोळा वर्षाची योजना घेतली तर त्यामध्ये दोन वर्षे ते पन्नास वर्षे वयोगटातील लोक खरेदी करू शकतात किंवा पंधरा वर्षाची योजना घेतली तर तीन वर्षे ते पन्नास वर्षे वयोगटातील लोक हा प्लॅन खरेदी करू शकतात.
काय मिळतात लाभ?
या पोलिसीअंतर्गत डेथ बेनिफिट दिला जातो व तो मूळ विमा रकमेपेक्षा जास्त किंवा तुमचा वर्षाचा जो काही प्रीमियम आहे त्यापेक्षा सातपट जास्त दिला जातो. मृत्यूच्या तारखेपर्यंत एकूण भरलेल्या प्रीमीयम पैकी जास्तीत जास्त 105% इतका तो असू शकतो. तसेच या प्लानमध्ये कर बेनिफिट देखील मिळतो.
या योजनेत जे काही प्रीमियम भरले आहेत त्या प्रीमियमला आयकर कलम 80C अंतर्गत करा मधून देखील सूट मिळते. तसेच या योजनेच्या परिपक्वतेवर प्राप्त झालेली रक्कम कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहे. तसेच तुम्ही पॉलिसीचे हप्ते भरल्यानंतर दोन वर्षांनी पॉलिसी सरेंडर देखील करता येते व त्यावर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकतात.