Personality Test:- समाजामध्ये वावरत असताना आपण दररोज अनेक व्यक्तींना भेटतो व प्रत्येक व्यक्तीचे वागणे आणि त्याचे व्यक्तिमत्त्व तसेच वागण्या बोलण्याच्या तऱ्हा यामध्ये आपल्याला वेगळेपण दिसून येते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो किंवा एक दोन भेटी आपल्या होतात तरी आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याच्या व्यक्तिमत्व नेमके कशा प्रकारचे आहे हे ओळखता येत नाही.
बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा पहिल्यांदा भेटतो या पहिल्या भेटीदरम्यान आपण त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून किंवा त्याच्या एकंदरीत वागणुकीवरून जो काही अंदाज लावतो तसेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची प्रतिमा आपल्या मनात तयार होते. परंतु बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा परिस्थितीनुसार बदलत असतो.
परंतु तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व किंवा स्वभावाबद्दल तंतोतंत माहिती मिळवायची असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या शरीराच्या एखाद्या अवयवाच्या आकारावरून देखील ते ओळखू शकतात व यालाच आपण व्यक्तिमत्व चाचणी असे देखील म्हणतात.
त्यामुळे या लेखात आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर ओळखायचा असेल तर त्याच्या पायाच्या बोटांच्या आकारावरून कसा ओळखावा? त्याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
पायाच्या बोटांवरून ओळखा एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव
1- पायाचे पहिले आणि दुसरे बोट- काही लोकांच्या पायाचे पहिले आणि दुसरे बोट समान असते. अशा प्रकाराचे बोटे असलेले लोक आयुष्यामध्ये खूप मेहनत घेतात व त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ते अनेक प्रकारचे यश मिळवत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या मेहनतीमुळे ते खास करून ओळखले जातात. ते चांगले स्वभावाचे असले तरी काही वेळा मात्र त्यांच्यात वाद होण्याची शक्यता असते.
2- पायाच्या बोटांचा आकार सारखा असणे- बऱ्याच लोकांच्या पायाच्या बोटांचा आकार हा सारखाच असतो व त्यांचे सर्व बोटे सारखीच असतात. परंतु अंगठा मात्र थोडा मोठा असतो. अशाप्रकारे बोटांची रचना असणारे लोक हे बोलण्यामध्ये म्हणजे संभाषणामध्ये खूप चांगले असतात व ते सहसा मृदूभाषी असतात
व यामुळेच ते इतर लोकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यात यशस्वी होतात. अशा प्रकारच्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगायला आवडते व त्यांना प्रवास करायला देखील खूप आवडतो.
3- लांब व गोल आकाराची बोटे- काही लोकांच्या पायाची बोटे लांब असतात व पुढच्या बाजूचा आकार हा गोलाकार असतो.अशा प्रकारच्या पायांची बोटांची रचना असलेले लोक बोलण्यात म्हणजे संभाषणामध्ये खूप चांगले असतात व ते नेहमी त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वामुळे इतर लोकांना आकर्षित करतात.
तसेच ते पैशांच्या बाबतीत देखील नशीबवान असतात व आयुष्यात खूप पैसा मिळवतात. तसेच कष्टाच्या आणि कठोर मेहनतीच्या जोरावर ते भरपूर प्रमाणात यश आणि सुख-समृद्धी व पैसा मिळवतात.