Profitable Business Idea:- आजकालच्या कालावधीमध्ये स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असणे ही काळाची गरज आहे. कारण उच्च शिक्षण घेऊन देखील नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे या गंभीर अशा समस्येवर प्रमुख उपाय म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हा होय.
त्यामुळे आता अनेक उच्च शिक्षित तरुण देखील व्यवसायांकडे मोठ्या प्रमाणावर वळल्याचे चित्र आहे. व्यवसाय सुरू करताना कमीत कमी गुंतवणूकितून जास्तीत जास्त नफा कोणत्या व्यवसायातून मिळेल या दृष्टिकोनातून व्यवसायाची निवड केली जाते.
अशा पद्धतीचे अनेक व्यवसाय आहेत की ते तुम्हाला कमी गुंतवणुकीत देखील मोठा नफा देऊ शकतात. त्यामुळे याच पद्धतीच्या एका व्यवसायाबद्दल आपण लेखात माहिती घेणार आहोत. जो तुम्ही कमी करता गुंतवणुकीत सुरू करू शकतात आणि तुमचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करू शकतात. विशेष म्हणजे हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून सुरु करू शकतात.
बेकरी व्यवसाय देईल तुम्हाला कमी गुंतवणुकीत भरपूर नफा
आजच्या कालावधीमध्ये बेकरी उत्पादनांची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अनेक लोक कुकीज, केक तसेच ब्रेड आणि पेस्ट्री सारख्या बेकरी उत्पादनांचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करतात. वाढदिवसाच्या पार्टी असो किंवा लग्न समारंभ तसेच कार्यालयामधील एखादा समारंभ इत्यादी अनेक ठिकाणी बेकरी उत्पादने मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःची बेकरी सुरू करू शकतात. ज्यामुळे ज्या लोकांना कमी गुंतवणुकीत चांगला परतावा हवा आहे त्यांच्यासाठी बेकरी व्यवसाय उत्तम पर्याय आहे. आपल्याला माहित आहे की या व्यवसायामध्ये केक, कुकीज तसेच पेस्ट्री, ब्रेड आणि पिझ्झा बेस अशी उत्पादने तयार केली जातात.
ही उत्पादने तयार करण्यासाठी जो काही खर्च लागतो तो खूपच कमी असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्हाला जर केक बनवायचा असेल तर तुम्हाला 90 रुपये त्याकरिता खर्च येतो. परंतु तुम्ही तीनशे ते साडेचारशे रुपये पर्यंत त्याची विक्री करू शकतात. या दृष्टिकोनातून तुम्ही एका केक विक्रीतून तीनशे रुपयांच्या पुढे नफा मिळवू शकतात.
मोठे शहरांमध्ये बेकरी उत्पादनांना खूप मोठी मागणी आहे व लोकांची बदलती जीवनशैली आणि विशेष प्रसंगी बेकरी उत्पादनांची वाढती गरज त्यामुळे या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरून देखील सुरू करू शकतात.बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा सेटअप उभारण्याची आवश्यकता नाही
बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसा किंवा मोठा सेटअप उभारावा लागेल असे नसते. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम कुठली उत्पादने तुम्हाला बनवायचे आहेत हे ठरवावे लागेल. यामध्ये तुम्ही केक आणि पेस्ट्री,कुकीज आणि बिस्किटे तसेच ब्रेड आणि बन्स व चॉकलेट इत्यादी उत्पादने तयार करू शकतात. या दिलेल्या उत्पादनांपैकी तुम्ही कुठल्याही एका उत्पादनापासून या व्यवसायाची सुरुवात करू शकतात.
साधारणपणे कसे मिळू शकते मार्जिन?
समजा तुम्हाला एक केक तयार करण्यासाठी 90 रुपये खर्च येतो. याकरिता तुम्हाला मैदा, साखर, अंडी तसेच बेकिंग पावडर व इतर घटकांची आवश्यकता असते व या 90 रुपये खर्चामध्ये या घटकांची किंमत देखील समाविष्ट आहे व हाच केक तुम्ही 450 रुपयापर्यंत विकू शकतात.
तुम्ही दिवसाला जर पाच केक विकले तरी..
पाच केक बनवण्यासाठी तुम्हाला 90 रुपये प्रतिकेक प्रमाणे 450 रुपये खर्च येईल. परंतु तुम्ही बाजारात एक केक साडेचारशे रुपये पर्यंत विकून पाच केक पासून तुम्हाला 2250 इतकी कमाई होईल व यातून तुम्ही तुमचे पाच केक बनवण्यासाठी लागणारे साडेचारशे रुपये खर्च वजा केले तर 1800 रुपयांचा निव्वळ नफा तुम्हाला मिळतो. याचा अर्थ एका महिन्यात तुम्ही या हिशोबाने 60000 पर्यंत कमी करू शकता.
व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी?
कुठलाही व्यवसाय जर यशस्वी करायचं असेल तर त्याकरिता मार्केटिंग खूप गरजेचे असते. यामध्ये तुम्ही या सोशल मीडियाच्या युगात सोशल मीडियाचा वापर करून मार्केटिंग करू शकतात. याकरिता तुम्ही इंस्टाग्राम तसेच फेसबुक आणि व्हाट्सअप चा वापर करून तुमच्या उत्पादनाचे फोटो आणि व्हिडिओ यावर शेअर करू शकतात.
याशिवाय तुम्ही तुमच्या जवळचे दुकाने आणि कॅफे यांना देखील उत्पादनांचा पुरवठा करू शकतात. याही पुढे जात तुम्ही स्विगी आणि झोमॅटो सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहभागी होऊन त्या माध्यमातून देखील तुमची विक्री वाढवू शकतात.