स्पेशल

भारतातील एखाद्या राज्यात फिरायला जायचे असेल तर केरळला नक्कीच जा आणि ‘ही’ ठिकाणे पहा! मिळेल स्वर्गसुख अनुभवल्याचा आनंद

Published by
Ajay Patil

Tourist Places In Kerala:- भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत असलेल्या प्रत्येक राज्यात तुम्हाला पर्यटन स्थळांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. साधारणपणे प्रत्येक राज्यामध्ये निसर्ग संपदा भरपूर प्रमाणात असून मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांचा विकास हा झालेला असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे भारतात देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकांना देखील फिरण्यासाठी उत्तम असे पर्याय उपलब्ध होतात व अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील कुटुंब किंवा मित्रांसोबत भारतातील एखाद्या राज्यात आणि खास करून दक्षिणेकडील राज्यात फिरायला जायचे असेल तर तुमच्याकरिता केरळ हे राज्य बेस्ट ऑप्शन ठरू शकते. या ठिकाणी तुम्ही सप्टेंबर ते मार्च या कालावधीत गेला तर या ठिकाणचे आल्हाददायक असे हवामान अनुभवायला मिळते व यामुळे ठिकाणी या कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

तुम्ही जर केरळला गेलात तर या ठिकाणी पाहण्यासारखे आणि फिरता येईल अशी बरीच ठिकाणे आहेत. त्यातीलच आपण काही ठिकाणांची माहिती थोडक्यात बघणार आहोत. जे पाहिल्यानंतर तुम्हाला एक स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी घेता येईल.

केरळ मधील ही ठिकाणे फिरण्यासाठी आहेत उत्तम

1- अल्लेपी- तुम्ही जर केरळला गेला तर हे ठिकाण नक्की पहावे. या ठिकाणी असलेला वेंबनाड तलाव खूप पाहण्यासारखा असून या तलावाचे दृश्य मनाला मोहून टाकते. या तलावामध्ये तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकतात. तसेच या ठिकाणी हाऊस बोटची मजा देखील खूप मोठ्या प्रमाणावर घेता येते.

तुम्ही जर निसर्ग आणि प्राणीप्रेमी असाल तर अलेप्पी जवळील कुमारकोमला भेट देणे गरजेचे आहे. या ठिकाणी असलेले पक्षी अभयारण्य वेधशाळा टॉवरला भेट देऊ शकतात. इतकेच नाहीतर या ठिकाणी सुंदर पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तुम्हाला पाहता येतात.

कुमारकोम बीच हे पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले ट्रीप डेस्टिनेशन देखील आहे. या ठिकाणी तुम्ही उत्तम अशा रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आनंद घेत निसर्गाचा नजारा पाहू शकतात व त्यानंतर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद देखील घेऊ शकतात.

2- टेकड्डी- हे ठिकाण केरळ राज्याच्या इडुक्की जिल्ह्यामध्ये असून निसर्गप्रेमींसाठी हे डेस्टिनेशन खूपच खास आहे. टेकड्डी हिल स्टेशनमध्ये तुम्ही पेरियार वन्यजीव अभयारण्य, मंगला देवी मंदिर तसेच कुमिली, ठक्कडी तलाव तसेच मसाले आणि कॉफीच्या बागांसाठी ओळखले जाणारे मुराक्कडी देखील पाहू शकतात.

3- कोवालम- केरळच्या तिरुअनंतपुरम शहरात असलेली कोवालम बीच हे देखील खूप महत्त्वाचे असे डेस्टिनेशन आहे. या समुद्रकिनाऱ्याचे दृश्य मनात भरणारे असे आहे. हा समुद्र किनारा लाईट हाऊस बीच आणि दुसरा इव्हस बीच अशा दोन भागात विभागलेला आहे.

या किनाऱ्या जवळील असलेल्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आनंद घेता येतो तर लाईट हाऊस बीचवर पॅरासेलिंग जेट स्किइंग,सर्फीग सारखे अनेक उपक्रम तुम्हाला करता येतात. या ठिकाणी भेट दिल्याने तुम्हाला खूप ताजेपणा अनुभवायला मिळतो व तुम्ही एक प्रकारे रिचार्ज होतात.

4- मुन्नार- तुम्हाला जर उडणाऱ्या ढगांचा अनुभव जवळून घ्यायचा असेल तर केरळमधील मुन्नार हे डेस्टिनेशन खूपच फायद्याचे ठरेल. या ठिकाणी डोंगरावर जाऊन तुम्ही दूर दूर पर्यंत पसरलेली हिरवळ अनुभवू शकतात.

केरळमधील हे हिलस्टेशन असून पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आणि आवडीचे ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या चहाच्या मोठमोठ्या भागात तसेच ट्रेकिंग व माऊंटन बाईकिंग अशा साहशी उपक्रमांकरीता हे ठिकाण खूप बेस्ट ऑप्शन आहे.

Ajay Patil