स्पेशल

मारुतीची सुपरहिट कार ! 10 महिन्यात 1 लाख ग्राहकांची खरेदी…

Published by
Ajay Patil

देशातील प्रमुख कार उत्पादक कंपनी म्हणून मारुती सुझुकी ओळखली जाते व त्यासोबतच टाटा मोटर्स आणि महिंद्रा या दोन कंपन्यांचा कायमच वर्चस्व आपल्याला वाहन बाजारपेठेवर दिसून येते.या कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंटमधील कार उत्पादित करतात व त्यातल्या त्यात गेल्या काही वर्षापासून भारतीय ग्राहकांचा कल हा मोठ्या प्रमाणावर स्वस्तातल्या एसयूव्ही खरेदीकडे असल्यामुळे या कंपन्यांच्या  अनेक एसयूव्ही सेगमेंट मधील उत्तम अशा कार ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आहेत.

जर आपण 2024 या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातील एकूण कार विक्री पाहिली तर टाटाच्या पंचने अव्वल स्थान प्राप्त केले व या कारचे एक लाख दहा हजार पेक्षा जास्त युनिट विकले गेले. त्यासोबतच मारुती सुझुकीची Fronks या कारने देखील मोठी मजल मारली व बाजारपेठेत दाखल होताच 10 महिन्यात एक लाख कार विक्रीचा टप्पा देखील ओलांडला.

मारुती सुझुकी Fronks देशातील एकमेव अशी एसयूव्ही ठरली जिने बाजारपेठेमध्ये दाखल होताच एक लाख कार विक्रीचा टप्पा पार केला. त्यामुळे या लेखात आपण या कारमध्ये असलेली वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत.

 कसे आहे मारुती सुझुकी Fronks चे इंजिन?

मारुती सुझुकीच्या या कारमध्ये कंपनीकडून दोन इंजिनचा पर्याय देण्यात आला असून यातील पहिले इंजिन हे 1.0- लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असून ते कमाल शंभर बीएचपी पावर आणि 148 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

तर दुसरे इंजिन हे 1.2- लिटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असून ते 90 बीएचपी कमाल पावर आणि 113 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

या कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय ग्राहकांना उपलब्ध होतात व इतकेच नाही तर मारुती सुझुकीच्या  Fronks मध्ये सीएनजी पर्याय देखील मिळतो. हा पर्याय जास्तीत जास्त 77.5 बीएचपी पावर आणि 98 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

 कसे आहे या कारची इंटिरियर आणि वैशिष्ट्ये?

जर आपण या कारची केबिन पाहिली तर यामध्ये कंपनीच्या माध्यमातून अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंगला सपोर्ट करू शकेल अशी नऊ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलेली आहे व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये सहा एअर बॅग,

360 डिग्री कॅमेरा व इलेक्ट्रॉनिक स्थिरता प्रोग्राम इत्यादी महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले आहे. मारुती सुझुकीची Fronks या कारची प्रमुख स्पर्धा ही ह्युंदाई  वेन्यू, किया सोनेट तसेच महिंद्रा एक्सयुव्ही 3XO व मारुतीच्या ब्रिझा यासारख्या एसयूव्ही सोबत आहे.

 किती आहे या कारची किंमत?

मारुती सुझुकी Fronks ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सात लाख 51 हजार रुपयांपासून सुरू होते व या कारच्या टॉप मॉडेलची किंमत ही 13.4 लाख रुपये पर्यंत जाते.

Ajay Patil