स्पेशल

स्कूटर मार्केटमध्ये जुपिटर आहे बादशाह की एक्टिवा! वाचा दोन्ही स्कूटरची वैशिष्ट्ये आणि तुम्हीच ठरवा तुमच्यासाठी उत्तम स्कूटर

Published by
Ajay Patil

बाईक मार्केटमध्ये या पद्धतीने वेगवेगळे मॉडेल आणि वैशिष्ट्य असलेल्या बाईक लॉन्च करण्यात आलेले आहेत.अगदी त्याच पद्धतीने स्कूटर मार्केट देखील अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशाच स्कूटर मॉडेल्समुळे सध्या गजबजल्याचे आपल्याला दिसून येते. होंडा तसेच टीव्हीएस सारख्या अनेक बाईक उत्पादक कंपन्यांनी प्रसिद्ध अशी वैशिष्ट्य असलेली स्कूटर मॉडेल लॉन्च केलेली आहेत. त्यामुळे ग्राहकांना देखील आता अनेक स्कूटरचे पर्याय निर्माण झाले आहेत.

अशावेळी जर आपण स्कूटर घ्यायला बाजारात गेलो तर कोणती घ्यावी याबाबत बऱ्याचदा आपला गोंधळ होतो. सध्या जर आपण स्कूटरच्या दृष्टिकोनातून बघितले तर ग्राहकांमध्ये टीव्हीएस ज्युपिटर आणि होंडाची एक्टिवा 6G या दोन स्कूटर प्रामुख्याने ग्राहकांमध्ये जास्त मागणी असलेले आहेत. याकरिता या लेखामध्ये आपण या दोन्ही स्कूटरमधील काही महत्त्वाचा फरक तुलनात्मक दृष्ट्या बघू.

 टीव्हीएस ज्युपिटर आणि होंडा एक्टिवा 6G स्कूटरच्या किमती

तर आपण या दोन्ही स्कूटरच्या किमतीची तुलना केली तर टीव्हीएस ज्युपिटर ही ड्रम, ड्रम अलॉय, ड्रम स्मार्ट कनेक्ट आणि डिस्क स्मार्ट कनेक्ट अशा चार प्रकारांमध्ये येते व या स्कूटरची किंमत 73 हजार 700 ते 87 हजार 250 रुपये आहे.

या तुलनेत जर आपण होंडा एक्टिवा 6G ची किंमत बघितली तर ती स्टॅंडर्ड, डीलक्स आणि एज स्मार्ट या तीन प्रकारांमध्ये येते व याची किंमत 76 हजार 684 ते 82 हजार 684( एक्स शोरूम) किमतीसह येते.

 आकारमान आणि रचना कशी आहे?

टीव्हीएस ज्युपिटर आणि ऍक्टिव्हच्या जर आकारमानाच्या दृष्टिकोनातून तुलना केली तर नवीन ज्युपिटर एक्टिवा सहा जी पेक्षा लांब असल्याची दिसून येते व व्हीलबेस 15 मीमी लांब आहे.

एक्टिवा मध्ये 692 mm चे सीट देण्यात आले आहे व या तुलनेत जर आपण जुपिटरचे सीट बघितले तर ते 756 मीमी आहे. त्यामुळे ते रायडर आणि पिलियन करिता अधिक जाग देण्यात सक्षम आहे. जुपिटरचे आकार ऍक्टिवा पेक्षा जास्त जास्त असला तरी दोन्ही स्कूटरचे वजन मात्र 105 ते 106 किलो इतके आहे.

तसेच टीव्हीएस ज्युपिटरचा लुक पूर्वीपेक्षा अधिक शार्प आणि स्टायलिश बनवण्यात आला आहे. या स्कूटरच्या पुढच्या भागात एलईडी डेटाईम रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत व या स्कूटरच्या साईड प्रोफाइलमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

या स्कूटर च्या मागच्या बाजूला रुंद अशी फ्रेम आहे व त्यामुळे ही स्कूटर मागील बाजूने दिसायला खूप आकर्षक दिसते. त्या तुलनेत मात्र होंडाची ऍक्टिव्हा ही पारंपारिक डिझाईन सह येते व शेवटची 2020 मध्ये ती अपडेट करण्यात आली होती.

 कसे आहे इंजिन पावर?

टीव्हीएस जुपिटर 110 मध्ये कंपनीने 113 सीसी चे नवीन इंजिन दिले आहे व हे इंजिन आठ एचपी पावर आणि 9.8 एनएम चा टॉर्क जनरेट करते. या स्कूटर सेगमेंटमध्ये पहिल्यांदा iGo असिस्ट मायक्रो हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आलेले आहे व या स्कूटरमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावरफुल बॅटरी देण्यात आलेली आहे व ही बॅटरी आयएसजी मोटरला पावर देते.

या तुलनेत जर आपण होंडा एक्टिवा या स्कूटरचे इंजिन पाहिले तर कंपनीने 109cc इंजिन दिले असून जे 7.7 बीएचपी पावर आणि 8.9 एनएमचा टॉर्क जनरेट करते. यामध्ये एच स्मार्ट प्रकार उपलब्ध असून ज्यामध्ये रिमोट फंक्शन प्रदान केले आहे. परंतु या दोन्ही स्कूटरमध्ये सीव्हीटी म्हणजेच कंटिन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे.

 दोन्ही स्कूटरमध्ये असलेली ब्रेकिंग सिस्टम

टीव्हीएस ज्युपिटर च्या ब्रेकिंगच्या बाबतीत जर आपण विशेष बाब पाहिली तर या स्कूटरच्या टॉप वेरियंटमध्ये फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेकचा पर्याय देण्यात आला आहे. तर त्या तुलनेत एक्टिवाच्या सर्व प्रकारांमध्ये तुम्हाला फक्त ड्रम ब्रेकचा सेटअप पाहायला मिळतो.

परंतु दोन्ही स्कूटरच्या उच्च वेरियंटमध्ये अलॉय विल वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहे. त्यामध्ये एक्टिवाला मागच्या बाजूस विस्तीर्ण रबर असलेल्या लहान चाकासह एक स्टॅगर्ड विल लेआउट देखील देण्यात आला आहे.

 दोन्ही स्कूटरमध्ये आहेत ही समान वैशिष्ट्ये

दोन्ही स्कूटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समान वैशिष्ट्य देखील आहेत. यामध्ये ज्युपिटरच्या टॉप व्हेरियंटमध्ये फ्रंट एप्रनवर एलईडी लाईटबार, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट ॲप्रनच्या आत फ्युएल फिलर कॅप, एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टीव्हीएस चे SmartXonnect स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फंक्शन सारखे उत्कृष्ट वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले आहेत.

परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेगमेंट मधील टॉप स्पेक जुपिटर हे स्कूटर मॉडेल आहे ज्यामध्ये अँटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर सह सौम्य असे हायब्रीड तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे.

Ajay Patil