स्पेशल

उत्पन्नाचा दाखला काढायचाय ? मग ‘या’ वेबसाईटवर अर्ज करा, मात्र 21 दिवसांत मिळणार Income Certificate

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Income Certificate Online Application : शाळकरी विद्यार्थ्यांना, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी तसेच शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो.

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठीही शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदाराचा उत्पन्न दाखला लागतो.

मात्र, हा उत्पन्न दाखला अर्थातच इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी अडचण येते. उत्पन्न दाखला काढण्यासाठी अनेकांकडून एजंट लोकांकडून मोठी रक्कम वसूल केली जात असते. यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक तर होतेच शिवाय वेळही वाया जातो.

यामुळे आज आपण इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोण-कोणती कागदपत्रे लागतात

ओळखीचा पुरावा : खाली दिलेल्या 9 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र ओळखीचा पुरावा म्हणून सादर केले जाऊ शकते.
1) पारपत्र
2) पॅन कार्ड
3) आधार कार्ड
4) मतदाता ओळखपत्र
5) अर्जदाराचा फोटो
6) निमशासकीय ओळखपत्र
7) आर एस बी वाय कार्ड
8) म्रारोहयो जोब कार्ड
9) वाहन चालक अनुज्ञप्ती

पत्त्याचा पुरावा : खाली दिलेल्या बारा कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर केले जाऊ शकते.

1) पारपत्र
2) वीज देयक
3) भाडे पावती
4) आधार कार्ड
5) शिधापत्रिका
6) दूरध्वनी देयक
7) पाणीपट्टी पावती
8) मालमत्ता कर पावती
9) मतदार यादीचा उतारा
10) वाहन चालक अनुज्ञप्ती
11) मालमत्ता नोंदणी उतारा
12) ७/१२ आणी ८ अ चा उतारा

वयाचा पुरावा : खाली दिलेल्या चार कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्रे यासाठी सादर केले जाऊ शकते

1) जन्माचा दाखला
2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
3) प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा
4) सेवा पुस्तिका (शासकीय / निम – शासकीय कर्मचारी)
उत्पन्नाचा पुरावा : खाली दिलेल्या पाच कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्रे सादर केले जाऊ शकते.
1) आयकर विवरण पत्र
2) सर्कल ऑफीसरचा पडताळणी अहवाल
3) वेतन मिळत असल्यास फॉर्म न १६
4) निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र
5) अर्जदार जमीन मालक असल्यास ७/१२ आणी 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल

स्वयंघोषणापत्र : उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी स्वयंघोषणापत्र देखील आवश्यक असते.
इतर दस्तऐवज : याशिवाय वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी दिले जाणारे प्रमाणपत्र / आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा
यासाठी सर्वप्रथम आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर अर्जदाराला या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे.

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन घ्यावे लागेल. लॉगिन घेतल्यानंतर मग महसूल विभागात जाऊन मिळकत प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. यानंतर लागू करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर मग एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर अर्जदाराला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेली फी भरावी लागणार आहे. यानंतर मग अर्ज सबमिट करायचा आहे. एकदा की अर्ज सबमिट झाला की 21 दिवसात उत्पन्नाचा दाखला मिळत असतो.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24