स्पेशल

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  टीम इंडियाने आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. विराटसेनेने आफ्रिकेचा पहिल्या कसोटी सामन्यात (India Vs South Africa 1st Test) पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.

भारताने आफ्रिकेवर 113 धावांनी मात केली आहे. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेला 191 धावांवर रोखले.

यासह भारताने विजय साकारला. टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय ठरला. सुनील गावसकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी यासारख्या दिग्गजांनी टीम इंडियाचं कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व केलं.

मात्र आतापर्यंत यााधी कधीही टीम इंडियाला सेंचुरियनमध्ये विजय मिळवता आला नव्हता. मात्र टीम इंडियाने कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातच ही किमया करुन दाखवली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office