भारताच्या प्रत्येक राज्यांमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध अशी स्थळे आहेत व अशा स्थळांना भेटी देण्यासाठी कुठल्याही कालावधीमध्ये पर्यटकांची भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होत असते. खास पर्यटनाला सुगीचे दिवस येतात ते पावसाळ्याच्या कालावधीमध्ये. कारण या कालावधीमध्ये सगळीकडे हिरवाई पसरलेली असते तसेच दाट धुक्याची चादर, सगळीकडे हिरवाईने नटलेली सृष्टी, रिमझिम पडणारा पाऊस अशा वातावरणामध्ये पर्यटनासाठी जाणे ही एक पर्वणी ठरते.
याच पद्धतीने तुमचा देखील मित्र किंवा कुटुंबासोबत भारतातील एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान असेल तर तुम्ही भारतातील बेंगलोर पासून अवघे चार किलोमीटर असलेल्या एका ठिकाणाला भेट देऊ शकता व अनेक ऐतिहासिक स्थळे व मंदिरे एकाच ठिकाणी पाहू शकतात. त्याशिवाय निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेले हे ठिकाण वन्यजीव तसेच शांतता व पहाल तिकडे हिरवळ यासाठी प्रसिद्ध आहे.
कर्नाटक मधील कुर्गला भेट द्या आणि निसर्गाचा आनंद लुटा
1) एबी फॉल्स –
बेंगलोर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुर्ग या ठिकाणाला भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी असलेला एबी फॉल्स नावाचा एक सुंदर धबधबा आहे व या धबधब्याला ब्रिटिश कालावधीमध्ये जेसी फॉल्स असे म्हणायचे. अनेक पर्यटक या धबधब्याला भेट देतात व यामध्ये भिजून आल्या नंतर चहा आणि कॉफीचा आनंद घेत पर्यटक मंत्रमुग्ध होता.
2) नामद्रोलिंग मठ –
कुर्ग हिल स्टेशन पासून साधारणपणे 34 किलोमीटर अंतरावर नामद्रोलिंग मठ आहे. विशेष म्हणजे या मठाला स्वर्ण मंदिर असे देखील म्हटले जाते. नामद्रोलिंग मठ हे बौद्ध धर्माचे शिक्षण देणारे एक मोठे गुरुकुल देखील आहे.
3) महाराजांची खुर्ची –
कुर्गमध्ये महाराजांचे खुर्ची या नावाचे एक सुंदर असे गार्डन असून त्याच्या विशेष अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक ऐतिहासिक समृद्ध अशी ठिकाणे देखील असून या ठिकाणी असलेल्या बगीच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कारंजे तुम्हाला बघायला मिळतात. इतकेच नाही तर या ठिकाणी तुम्हाला सनसेट आणि सनराइज म्हणजेच सूर्यादय आणि सूर्यास्त पाहण्याचा अलौकिक आनंद देखील या ठिकाणाहून घेता येतो.
4) मंडलपट्टी पॉईंट –
जर आपण मंडल पट्टी या शब्दाचा अर्थ ढगांचा बाजार असा होतो. मंडलपट्टी पॉईंटवरून तुम्ही ढगांमध्ये गायब झालेले डोंगरदऱ्या पाहण्याचा अलौकिक आनंद अनुभवता येतो. मंडलपट्टी पॉईंट हा साधारणपणे समुद्रसपाटीपासून ४०५० फूट उंच डोंगरावर आहे. हा जो काही डोंगर आहे तो पुष्पग्री रिझर्व फॉरेस्टचा एक भाग आहे.