स्पेशल

Inox Wind च्या शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक खरेदी करावा का? टार्गेट प्राईस काय ?

Published by
Tejas B Shelar

Inox Wind Share Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. नववर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस शेअर बाजारात तेजी राहिली मात्र नंतर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दरम्यान आता गेल्या दोन दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये तेजी आली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.

बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये सलग दुसर्‍या दिवस वाढीची नोंद करण्यात आली आहे. यामुळे बरेच स्टॉक सुद्धा तेजीत पाहायला मिळत आहेत. यामध्ये प्रसिद्ध एनर्जी स्टॉक आयनॉक्स विंड लिमिटेडच्या शेअर्सचा सुद्धा समावेश होतो.

या कंपनीच्या स्टॉकमध्ये बम्पर बाउन्स दिसला आहे. आयनॉक्स विंड लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज 15 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, आणखी एक लोकप्रिय एनर्जी स्टॉक सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्येही आज तेजी पाहायला मिळाली आहे. याला आज अप्पर सर्किट लागले आहे.

खरेतर हे दोन्ही स्टॉक गुंतवणूकदारांमध्ये खूपचं लोकप्रिय आहेत आणि गुंतवणूकदारांचे या दोन्ही स्टॉक कडे विशेष लक्ष असते. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही स्टॉक साठी गुंतवणूकदारांनी काय सल्ला दिला आहे, या स्टॉक साठी काय टार्गेट प्राईज देण्यात आली आहे? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Inox अन सुझलॉनमध्ये तेजी आली

आज बुधवारी, 29 जानेवारी 2025 रोजी आयनॉक्स विंड लिमिटेडचे ​​शेअर्स 138 रुपयांच्या पातळीवर खुले झाले. तसेच हा शेअर आज दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे 155.90 रुपयावर पोहचला.

अर्थातच या शेअरमध्ये आज 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. त्याच वेळी, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सला सुद्धा अप्पर सर्किट लागले आहे. सुझलॉनचे शेअर्स 52.77 च्या पातळीवर 5% च्या अप्पर सर्किटसह खुले झाले.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सुझलॉन एनर्जी लिमिटेडने काल अर्थातच 28 जानेवारी 2025 रोजी तिमाही निकाल जाहीर केला, त्यानंतर आज तो फोकस मध्ये आला आणि या स्टॉकची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली अन म्हणूनच याला अप्पर सर्किट सुद्धा लागले. आता आपण या दोन्ही स्टॉक साठी काय टार्गेट प्राईज देण्यात आली आहे हे पाहुयात.

सुझलॉनसाठी काय टार्गेट प्राईज देण्यात आली?

मॉर्गन स्टेनलीने सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे ओवरवेट रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेजला असे वाटते की, पुढील एका वर्षात या स्टॉकमध्ये 40 टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते. यासाठी ब्रोकरेजने या स्टॉक साठी 71 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

Inox Wind ची टारगेट प्राईज काय?

Inox विंडचा स्टॉकची किंमत पुढील एका वर्षात 80 टक्क्यांहून अधिक वाढू शकते, ज्यासाठी टार्गेट प्राईस 247 रुपये निश्चित करण्यात आली आहे आहे. आयसीआयसीआयसी सिक्युरिटीजने या स्टॉकला नुकतेच बाय रेटिंग दिले होते. म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला होता तसेच यासाठी 245 रुपयांचे टार्गेट प्राईज देखील देण्यात आले होते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar